MIM चे खासदार म्हणतात, ‘शिवसेनेचे चार तुकडे झाले तर आमच्यासाठी चांगलंच’

मुंबई तक

MIM MP Imtiyaz Jaleel Statement on Shiv Sena: नवी मुंबई: एमआयएमचे (MIM) पहिले राष्ट्रीय अधिवेशन नवी मुंबई पार पडत आहे. याच अधिवेशनासाठी MIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. पण यावेळी इम्तियाज जलील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

MIM MP Imtiyaz Jaleel Statement on Shiv Sena: नवी मुंबई: एमआयएमचे (MIM) पहिले राष्ट्रीय अधिवेशन नवी मुंबई पार पडत आहे. याच अधिवेशनासाठी MIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. पण यावेळी इम्तियाज जलील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. (mim mp imtiyaz jaleel says shiv sena split into four will be good for us)

‘शिवसेनेचे दोन किंवा चार गट होऊ दे.. हीच आमची प्रार्थना असून याचा फायदा आम्हालाच होणार आहे.’ असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलं आहे. पण त्यावरून आता शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

नेमकं काय म्हणाले इम्तियाज जलील?

‘शिवसेनेचे दोन किंवा चार गट होऊ दे.. हीच आमची प्रार्थना असून याचा फायदा आम्हालाच होणार आहे. शिवसेनेचा जन्म काँग्रेस राष्ट्रवादी विरोधासाठी, मात्र सत्तेसाठी उद्धव ठाकरे आघाडीत गेले. एकनाथ शिंदे यांचा सगळा रिमोट देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याकडे आहे.’

मालेगाव महापालिका आयुक्तांवर गटारीचं पाणी, चहा ओतला; MIM आमदारांच्या आंदोलनातील प्रकार

हे वाचलं का?

    follow whatsapp