Shambhuraj: याच बांधकामामुळे शिंदे सरकारमधील आणखी एक मंत्री वादात

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सातारा: स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्या पाठोपाठ शिंदे सरकारमधील आणखी एक मंत्री वादात सापडले आहेत. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई ठाकरे गटाच्या निशाण्यावर आले आहेत. देसाई यांनी महाबळेश्वरजवळील नावली येथील गट क्रमांक – 24 मधील शेत जमिनीवर घराचे अवैध बांधकाम केल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

काय आहे नेमकं प्रकरण?

मंत्री शंभूराज देसाई यांची महाबळेश्वरजवळील नावली येथील गट क्रमांक-24 मध्ये जमीन आहे. सदर जमीन ही त्यांच्याच नावावर आहे. निवडणूक शपथपत्रात या जमिनीवर शेतजमीन आणि घर असा उल्लेख आहे. परंतु जागेच्या ७/१२ उताऱ्यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही, त्यामुळे हे बांधकाम अवैध असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सदरची जमीन इकोसेन्सेटिव्ह झोनमध्ये येत असल्याने कोणत्याही बांधकामास परवानगी नव्हती. मात्र कोणत्याही परवानग्या न घेता घराचं अवैध बांधकाम केलं आहे, असा आरोप करत देसाई यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही जागा शंभुराज देसाई यांनी १० वर्षांपुर्वी खरेदी केल्याचं सांगण्यात येत आहे. तर हे घर ६ ते ७ वर्षांपूर्वी बांधल्याची प्राथमिक माहिती भालगेवाडीच्या ग्रामस्थांनी दिली आहे.

हे वाचलं का?

अब्दुल सत्तार वादात :

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सत्तार यांनी वाशिमच्या घोड बाभूळ परिसरातील 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचं एका व्यक्तीला अनधिकृत रित्या वाटप केल्याचा आरोप आहे. यावरून विधानसभेत अजित पवारांसह विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT