नाईक, साळवी, देशमुख… ३ महिन्यात ठाकरेंचा तिसरा आमदार रडारवर
(Maharashtra Politics) अकोला : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आणखी एक आमदार चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची चिन्ह आहेत. अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे आमदार नितिन देशमुख यांना लाच-लुचपत विभागाने चौकशीसाठी आणि जबाबासाठी हजर राहण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. या नोटिसीप्रमाणे १७ जानेवारीला देशमुखांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र, अमरावती येथे उपस्थित राण्याबाबत सुचना देण्यात आली आहे. यावेळी सोबत मालमत्ता […]
ADVERTISEMENT

(Maharashtra Politics)
अकोला : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आणखी एक आमदार चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची चिन्ह आहेत. अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे आमदार नितिन देशमुख यांना लाच-लुचपत विभागाने चौकशीसाठी आणि जबाबासाठी हजर राहण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. या नोटिसीप्रमाणे १७ जानेवारीला देशमुखांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र, अमरावती येथे उपस्थित राण्याबाबत सुचना देण्यात आली आहे. यावेळी सोबत मालमत्ता विवरणही सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.
नितीन देशमुख हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावंत आमदार म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ न देता गुवाहटीच्या रस्त्यातून नितीन देशमुख पळून आले होते. शिंदे गटाने सुरतला पळवून नेत गुवाहटीला जाण्यासाठी दबाव आणला, मात्र मी तिथून पळून आल्याचं नितीन देशमुख यांनी सांगितलं होतं.
राजन साळवींचीही सुरु आहे चौकशी :
दरम्यान, नितीन देशमुख यांच्यापूर्वी डिसेंबर महिन्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे राजापूरचे आमदार आणि उपनेते राजन साळवीही लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आले आहेत. आमदार साळवींना रायगड लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडून मालमत्तेच्या चौकशी संदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार ते चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजरही झाले होते.