MLC : दीड वर्षांपूर्वी ‘त्या’ बैठकीत काय घडलेलं, ज्यामुळे अडबालेंनी मिळवला विजय

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

MLC Election : Nagpur teacher constituency

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी बाजी मारली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमधूनच काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांनी तब्बल 16 हजार 700 मतं घेतली. तर विद्यमान आमदार नागो गाणार यांना फक्त 8 हजार 211 हजार मतं मिळाली आहेत. सुधाकर अडबाले यांनी गाणारांपेक्षा दुप्पट मतं घेतली आहेत. (Sudhakar Adbale, a Congress-sponsored candidate, won from Nagpur, the stronghold of BJP, by getting twice as many votes as Nago Ganar.)

मोठं मताधिक्य घेऊन विजयी झाल्यानंतर अडबाले यांनी माध्यमांशीही संवाद साधला.

‘शिक्षण क्षेत्रात जो बदल आवश्यक होता, शिक्षकांच्या अनेक समस्या मागील 12 वर्षांपासून प्रलंबित होत्या. त्यामुळे या समस्या सोडविण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटनेने मला अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं. दोन वर्षांपासून आम्ही प्रचाराला सुरुवात केली. तर महाविकास आघाडीने मला पुरस्कृत केलं. महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेते मंडळींनी एकत्र येऊन येथे काम केलं. त्यामुळे हा एकजुटीचा विजय झाला आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

MLC Election Result: BJPने कोकणात मविआला लोळवलं, म्हात्रे ठरले जायंट किलर!

‘मागील 10 वर्षांपासून या राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आम्ही लढत होतो. अनेक तीव्र आंदोलनं आम्ही केली आहेत. हाच मुद्दा घेऊन सभागृहात आम्ही निश्चितच लढू. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करूच शकत नाही. परंतु ज्या-ज्या राज्यांमध्ये काँग्रेस समर्थित सरकार आहे त्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं मान्य केलं आहे. विद्यमान प्रतिनिधी ज्या पक्षाचं समर्थन घेऊन लढत होते त्या पक्षाची भूमिका आहे की, जुनी पेन्शन देऊच शकत नाही. त्यामुळेच या ठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे.’

ADVERTISEMENT

ती दीड वर्षांपूर्वीची बैठक ठरली अडबाले यांच्या विजयाची मुहूर्तमेढ :

नागो गाणार यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपने अखेरच्या टप्प्यापर्यंत निर्णय गेतला नव्हता. मात्र दुसऱ्या बाजूला अडबाले यांनी मागील दोन वर्षांपासूनच अधिकृतपणे तयारी सुरु केली होती. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने दीड वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीत अडबाले यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती.

ADVERTISEMENT

२२ मार्च २०२१ रोजी झालेल्या बैठकीला नागपूर शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार डी. यू. डायगव्हाणे, प्रांत अध्यक्ष श्रावण बरडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, शिक्षक मंडळाचे सदस्य जगदीश जुनगरी यांच्यासह पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि कार्यवाहक उपस्थित होते. 

MLC Election Result: तांबे की पाटील? अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष नाशिककडे

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ हा एकेकाळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा गड होता. डी.यू. डायगव्हाणे या मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते. त्यानंतर २०११ मध्ये प्रथमच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांनी माध्यमिक शिक्षक संघाच्या गडाला भगदाड पाडत विजय मिळवून विधानपरिषद गाठली होती. त्यानंतर २०१७ मध्ये गाणार पुन्हा विजयी झाले. 

त्यानंतर यंदा अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर दीड वर्षांपूर्वीच अडबाले यांनी तयारीला सुरुवात केली होती. दीड वर्षांच्या कालावधीत सहाही जिल्ह्यात संपर्क, समविचारी संघटना, समविचारी पक्षाशी जुळवून घेत अडबाले यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. अडबाले यांनी आतापासून तयारी केल्यास कुणीही पराभव करू शकणार नाही असं डायगव्हाणेंनी त्याचवेळी सांगितलं होतं. त्यानंतर काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्यानंतर अडबाले यांनी मागे वळून न पाहता थेट विजयापर्यंत मजल मारली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT