मुंबईतली कराची बेकरी बंद, कार्यकर्ते मैदानात; मनसेने हात झटकले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

१९५३ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेल्या कराची बेकरी या मुंबईतील प्रसिद्ध दुकानाविरोधात मनसेने काही दिवसांपूर्वी मोहीम उघडली होती. भारताविरोधात अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानमधील शहराचं नाव दुकानाला देऊ नये यासाठी मनसेने मुंबईतील कराची बेकरी दुकानाविरोधात आंदोलन केलं. पण या आंदोलनादरम्यान मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पक्ष नेतृत्वातील विसंवाद पुन्हा एकदा समोर आला आहे. मनसेचे उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतील कराची बेकरीचं दुकानं बंद पाडायला लावलं.

ADVERTISEMENT

हाजी सैफ शेख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती दिल्यानंतर अवघ्या काही मिनीटांमध्येच मनसे नेते संदीप देशपांडे आणि पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन कराची बेकरीविरोधातील आंदोलन ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचं जाहीर केलं.

भारताविरुद्ध अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानमधील कराची शहराचं नाव दुकानाला देऊन देशातील लोकांच्या राष्ट्रवादाच्या भावनेला ठेच पोहचवली जात असल्याचा आरोप हाजी शेख यांनी केला होता. मध्यंतरीच्या काळात हे प्रकरण शांत झालं होतं. परंतू मनसे सैनिकांनी पुन्हा एकदा कराची बेकरीविरोधात आपला मोर्चा उघडत मुंबईतलं दुकान बंद पाडायला लावलं आहे. परंतू पक्ष नेतृत्वाने घेतलेल्या भूमिकेमुळे आगामी दिवसांत नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT