एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे उद्या ‘शिवाजी पार्क’वर एकत्र!
राज्यातल्या राजकारणात सातत्यानं मनसे-भाजप युतीच्या चर्चा होत असतात. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप एकत्र येऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत असते. महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही महिन्यात भाजप-मनसे जवळ येताना दिसत असतानाच आता राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवाजी पार्कवरील कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबईतल्या शिवाजी पार्क […]
ADVERTISEMENT

राज्यातल्या राजकारणात सातत्यानं मनसे-भाजप युतीच्या चर्चा होत असतात. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप एकत्र येऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत असते. महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही महिन्यात भाजप-मनसे जवळ येताना दिसत असतानाच आता राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवाजी पार्कवरील कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवारी (२१ ऑक्टोबर) दीपोत्सव कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे.
मनसेच्या कार्यक्रमानिमित्त तीन महत्त्वाचे नेते एकत्र येणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम होणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीशी कनेक्शन?
दीपोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येत आहे. मात्र, तिन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याचं कनेक्शन मुंबई महापालिका निवडणुकीशीही लावलं जात आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या काही महिन्यात भेटी झाल्या आहेत. भाजपच्या नेत्यानीही राज ठाकरेंच्या भेटी घेतल्या आहेत. राज्यातल्या सत्तांतरानंतर बहुमत चाचणीवेळीही मनसेनं शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला.