या सरकारला ‘अमराठी’ का म्हणू नये, मनसे नेते खोपकर संतापले

मुंबई तक

मुंबई: मराठी भाषा दिनानिमित्त मनसेने मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात ‘मराठी स्वाक्षरी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, कोरोना संसर्गामुळे पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. यानंतर मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या सरकारला ‘अमराठी’ का म्हणू नये? असं सवाल विचारात प्रचंड संताप व्यक्त केला आहे. याचवेळी खोपकर असंही म्हणाले आहेत की, ‘गंभीर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: मराठी भाषा दिनानिमित्त मनसेने मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात ‘मराठी स्वाक्षरी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, कोरोना संसर्गामुळे पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. यानंतर मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या सरकारला ‘अमराठी’ का म्हणू नये? असं सवाल विचारात प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

याचवेळी खोपकर असंही म्हणाले आहेत की, ‘गंभीर आरोप असलेल्या संजय राठोड यांच्यासारखे मंत्री गर्दी जमवत असताना त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक नाही.’ त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावरुन मनसे-शिवसेना यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मनसेकडून 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे मराठी भाषा दिनानिमित्त मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाचं आयोजन केले होतं. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठी कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमासाठी मनसेकडून पोलीस आणि मुंबई महापालिकेकडे रितसर परवानगी मागितली होती. पण राज्यातील कोरोना संसर्ग लक्षात घेता पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच हा कार्यक्रम केल्यास अमेय खोपकर आणि मनसे कार्यकर्त्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp