डोंबिवलीत मनसेला खिंडार, सेना-भाजपाकडून मनसे नेत्यांची पळवापळवी

मुंबई तक

कल्याण डोंबिवली निवडणुकांचे वेध लागताच डोंबिवलीमध्य़े फोडाफोडीच्या राजकारणाला जोरदार सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षातल्या दमदार नेत्यांना गळाला लावण्याचे प्रकार सुरु झाले असून या घोडेबाजारात मनसेला मोठं खिंडार पडलं असून मनसेचा एक नेता शिवसेनेने तर दुसरा नेता भाजपने पळवला आहे. मनसे पक्षस्थापनेपासून राज ठाकरेंसोबत असणारे राजेश कदम आता शिवसेनेत तर महापालिकेत विरोधी पक्षनेते असलेले मंदार हळबे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कल्याण डोंबिवली निवडणुकांचे वेध लागताच डोंबिवलीमध्य़े फोडाफोडीच्या राजकारणाला जोरदार सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षातल्या दमदार नेत्यांना गळाला लावण्याचे प्रकार सुरु झाले असून या घोडेबाजारात मनसेला मोठं खिंडार पडलं असून मनसेचा एक नेता शिवसेनेने तर दुसरा नेता भाजपने पळवला आहे.

मनसे पक्षस्थापनेपासून राज ठाकरेंसोबत असणारे राजेश कदम आता शिवसेनेत तर महापालिकेत विरोधी पक्षनेते असलेले मंदार हळबे भाजपमध्ये दाखल झाल्याने मनसेला चांगलाच धक्का बसला आहे.

राजेश कदम कल्याण डोंबिंवली भागात मनसेचा मुख्य चेहरा होते. मनसेने रेल्वे भरतीच्या वेळी जे आंदोलन केले होते त्यात राजेश कदम यांची मुख्य भूमिका होती आणि या प्रकरणाता त्यांना जेलची हवा देखील खावी लागली होती. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा चुरशीच्या निवडणुकीत जो विजय झाला होता त्यात राजेश कदम यांचा मोलाचा वाटा होता. याच राजेश कदम यांचा शिवसेना पक्षप्रवेश सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर पार पडला.

हे वाचलं का?

    follow whatsapp