औरंगाबाद : ‘राज’सभेचा पदाधिकाऱ्याला फटका, गर्दीत 25 तोळ्याची सोन्याची चेन चोरट्यांनी पळवली

मुंबई तक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे झालेली सभा सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे. परंतू या सभेला उपस्थित राहणं मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष माँटीसिंग जहागीरदार यांच्या गळ्यातली 25 तोळ्याची सोन्याची चेन चोरट्यांनी लांबवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माँटीसिंग हे 1 मे च्या सभेसाठी नांदेडवरुन औरंगाबादला कार्यकर्त्यांसह दाखल झाले […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे झालेली सभा सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे. परंतू या सभेला उपस्थित राहणं मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष माँटीसिंग जहागीरदार यांच्या गळ्यातली 25 तोळ्याची सोन्याची चेन चोरट्यांनी लांबवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माँटीसिंग हे 1 मे च्या सभेसाठी नांदेडवरुन औरंगाबादला कार्यकर्त्यांसह दाखल झाले होते. या सभेत हजारो लोकांनी उपस्थिती लावली होती. या गर्दीत माँटी यांच्या गळ्यातली चेन अज्ञात चोरट्याने पळवली. काही वेळाने याबद्दल माँटीसिंग यांना समजताच त्यांनी औरंगाबादेतील सीटी चौक पोलीस ठाण्यात या घटनेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. याच पोलीस ठाण्यात राज ठाकरे आणि सभेच्या आयोजनकांवर प्रक्षोभक विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loudspeaker Row : राज ठाकरेंच्या इशाऱ्यांनतर मुंबई पोलीस आयुक्त धर्मगुरुंना काय म्हणाले?

राज ठाकरे यांच्या याच सभेत गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारी करणाऱ्या तरुणांनीही पैश्याच्या हिस्स्यावरुन झालेल्या वादात आपल्याचसोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला भोसकल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अटक केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp