मनसेची उत्तरसभा: ‘तो’ आवाज राज ठाकरेंचा की बाळासाहेबांचा…?
मुंबई: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या सभेनंतर ठाण्यात उद्या (12 एप्रिल) ‘उत्तरसभा’ होणार आहे. याच उत्तरसभेसाठी मनसेने एक टीझर ट्विटरवर लाँच केला आहे. पण आता याच टीझरवरुन सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. ती चर्चा म्हणजे अशी की, नुकताच रिलीज करण्यात आलेल्या टीझरमध्ये जो आवाज वापरण्यात आला आहे […]
ADVERTISEMENT
मुंबई: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या सभेनंतर ठाण्यात उद्या (12 एप्रिल) ‘उत्तरसभा’ होणार आहे. याच उत्तरसभेसाठी मनसेने एक टीझर ट्विटरवर लाँच केला आहे. पण आता याच टीझरवरुन सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. ती चर्चा म्हणजे अशी की, नुकताच रिलीज करण्यात आलेल्या टीझरमध्ये जो आवाज वापरण्यात आला आहे तो नेमका कुणाचा आहे? अनेकांच्या मते हा आवाज राज ठाकरे यांचा आहे तर काहींच्या मते बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thacekray) एखाद्या जुन्या सभेतील हा आवाज आहे.
ADVERTISEMENT
सगळ्यात आधी पाहूयात ‘त्या’ टीझरमध्ये नेमकं काय म्हटलंय?
‘वारं खूप सुटलंय आणि जे सुटलंय ते आपलंच आहे’ असं या ट्विझरमध्ये म्हटलं आहे. या टिझरमध्ये होय… हिंदूधर्माभिमानी असं देखील भगव्या रंगात लिहलं आहे.
हे वाचलं का?
जरा मोकळं बोलले तर इतकी हवा,
मनमोकळं बोलले तर मग एकदम धुव्वा.#उत्तरसभा #MNS #हिंदू_धर्माभिमानी pic.twitter.com/3SZQYKoPOr— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) April 11, 2022
हे टिझर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केलं आहे.
‘त्या’ आवाजाची एवढी चर्चा का?
ADVERTISEMENT
उत्तरसभेसाठी जे टिझर शेअर करण्यात आलं आहे त्यातील जो आवाज आहे तो हुबेहूब दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाटत आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरु झाली आहे. मात्र, असं असलं तरी हा आवाज बाळासाहेब ठाकरे नव्हे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाच आहे.
ADVERTISEMENT
बाळासाहेब ठाकरे यांची वक्तृत्व शैली, बोलण्याची ढब हे सारं काही राज ठाकरेंमध्ये हुबेहूब उतरलं आहे. त्यामुळेच अनेकजण राज ठाकरे यांची तुलना बाळासाहेबांशी करतात. बाळासाहेबांचा जो आवाज होता त्याच पद्धतीचा आवाज हा राज ठाकरेंचा देखील असल्याचं बोललं जातं. त्यामुळेच आजच्या या टिझरमुळे पुन्हा एकदा तो आवाज बाळासाहेब की राज ठाकरे यांचा याविषयी चर्चा सुरु झाली आहे. पण तो आवाज हा राज ठाकरे यांच्याच आहे आणि तो एका जुन्या सभेतील आहे.
राज ठाकरेंना का घ्यावी लागतेय ‘उत्तरसभा’?
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात कट्टर हिंदूत्ववादी भूमिका घेत मशिदीवरील भोंग्यांना जोरदार विरोध केला. त्यांच्या याच भूमिकेमुळे मनसेमध्ये मात्र चलबिचल असल्याचं दिसून आलं आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षानेही राज ठाकरेंच्या या भूमिकेवर टीका केली आहे. असं असताना आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करण्यासाठी राज ठाकरे हे उद्या (12 एप्रिल) ठाण्यात जाहीर सभा घेणार आहे. ज्याला त्यांनी ‘उत्तरसभा’ असं नाव दिलं आहे.
राज ठाकरेंना का घ्यावी लागतेय ‘उत्तर’ सभा.., भोंग्यावरुन मनसेमध्ये नेमकं चाललंय काय?
आदेशाची धार बोथट झाली?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या करिष्माला काहीशी उतरती कळा लागल्याचं मागील काही वर्षात पाहायला मिळत आहे. सलग दोन विधानसभा निवडणुकीत मनसेचा अवघा 1 आमदार निवडून येत आहे. असं असलं तरी राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एक मोठं नेतृत्व आहे. अनेक तरुण त्यांच्या पक्षाशी जोडलेले आहेत. पण असं असताना भोंग्यांच्या मुद्द्यावरुन ज्या पद्धतीने मनसेने दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत त्यावरुन पक्षात सारं काही आलबेल नसल्याचं समोर येत आहे.
याआधी राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर आंदोलनं उभी केली होती. त्यांच्या एका आदेशासरशी महाराष्ट्रातील लाखो तरुण हे उभे ठाकत होते. मात्र, असं असताना गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी जो आदेश दिला त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसतं आहे.
राज ठाकरे यांचं वलय पाहता आतापर्यंत तरुणाईने प्रत्येक आंदोलनात त्यांना भरभरुन साथ दिली. पण गुढीपाडवा मेळाव्यात ज्या पद्धतीने त्यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्यासाठी हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले आहेत त्याला मनसेतच काहीसा विरोध असल्याचे दिसून येत आहे.
यामागे काही कारणं देखील आहेत. मनसेचे असे अनेक नगरसेवक आहेत की ज्यांना आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांनी देखील मतदान केलं आहे. पण राज ठाकरेंच्या नव्या आदेशामुळे हे मतदार दुखावले जाण्याची अधिक शक्यता आहे. म्हणूनच अनेक ठिकाणी राज ठाकरेंचा आदेश पाळला गेला नसल्याचं दिसतं आहे.
दुसरीकडे सध्याच्या परिस्थितीत तरुण मुलं आपल्यावर विनाकारण कोणत्याही केसेस ओढावून घेण्यासाठी इच्छुक नाहीत. जर मशिदीवरील भोंग्यांसमोर स्पीकर लावले तर त्यातून काही तेढ निर्माण होऊ शकतो आणि या सगळ्याची परिणिती म्हणून सामाजिक वातावरण बिघडू शकतं. या सगळ्याचा विचार करुन देखील आता तरुण मुलं राज ठाकरेंच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कचरत आहेत.
ही सगळी परिस्थिती लक्षात घेता आणि पक्षातील कार्यकर्त्यांपर्यंत योग्य तो मेसेज पोहचला पाहिजे यासाठीच राज ठाकरे यांनी तात्काळ दुसरी सभा घेण्याचं ठरवलं आहे. आतापर्यंत निवडणूक प्रचार वगळता एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी राज ठाकरेंनी अशा पद्धतीने तात्काळ दुसरी सभा घेतली नव्हती. मात्र, आता त्यांना ती सभा घ्यावी लागतेय. त्यामुळे पक्षात सारं काही आलबेल नाही हेच यावरुन आपल्याला दिसून येते.
मात्र, तरीही 12 एप्रिलच्या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार आणि त्यांची भूमिका काय असणार याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT