मोहन डेलकरांच्या पत्नी आणि मुलाने हातावर बांधलं शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दादरा नगर हवेलीचे भाजपचे खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर आणि मुलगा अभिनव डेलकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित होते. मोहन डेलकर हे दादरा नगर हवेलीचे खासदार होते. त्यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. त्यांची सुसाईड नोट सापडली होती, यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात बराच गदारोळ झाला होता.

ADVERTISEMENT

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी सिल्वासाच्या जिल्हाधिकाऱ्यांची हायकोर्टात याचिका

मोहन डेलकर हे दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार होते. डेलकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. या पार्श्वभूमीवर मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि अभिनव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

हे वाचलं का?

मोहन डेलकर यांची सुसाईड नोट

मरीन लाईन्स चौपाटी येथील सी ग्रीन हॉटेलमधील रूममध्ये मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. खासदार मोहन डेलकर यांनी 15 पानांची सुसाईड नोट लिहिली असून, ही नोट खासदारांसाठी असलेल्या लेटरहेडवर लिहिली असल्याचं मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

ADVERTISEMENT

कोण होते मोहन डेलकर?

ADVERTISEMENT

58 वर्षीय मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. 1989 मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र 2019 मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT