महाराष्ट्रात दिवसभरात कोरोनाचे 3 हजाराहून अधिक रूग्ण पॉझिटिव्ह, 35 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात कोरोनाचे 3 हजार 75 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 35 कोरोना मृत्यूंची दिवसभरात नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 3 हजार 56 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 2 हजार 816 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.5 टक्के इतका झाला आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. तर आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 कोटी 58 लाख 36 हजार 107 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी एकूण 64 लाख 94 हजार 254 पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला राज्यात 2 लाख 95 हजार 772 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1954 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्याच्या घडीला 49 हजार 796 सक्रिय रूग्ण आहेत.

देशात मागच्या 24 तासांत 33 हजार 376 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 91 हजार 516 झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात 32 हजार 198 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 3 कोटी 23 लाख 74 हजार 497 वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता 97.49 टक्के इतका झाला आहे.

हे वाचलं का?

देशात आतापर्यंत कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या सहा लसींना परवानगी देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस आणि झायडस कॅडिलाच्या तीन डोस असलेल्या ‘झायकोव्ह-डी’ या लसींना परवानगी दिली आहे. यामुळे देशात लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागातही लसीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. जगभरातल्या अनेक देशांपेक्षा राज्यातला लसीकरणाचा वेग अधिक असल्याचं दिसत आहे.

मुंबई 365 नवे रूग्ण

ADVERTISEMENT

मुंबईत दिवसभरात 365 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर 232 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. मुंबईत आज घडीला 4666 सक्रिय रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत मुंबईत 7 लाख 11 हजार 554 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT