काळजीत भर! महाराष्ट्रात दिवसभरात Corona रुग्ण संख्या ३० हजारांच्यावर
महाराष्ट्राच्या काळजीत भर टाकणारी बातमी पुन्हा एकदा समोर आली आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात ३० हजार ५३५ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात ११ हजार ३१४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. नव्या कोरोना रूग्णांमुळे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेटही ९० टक्क्यांच्या खाली आला आहे. महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता ८९.३२ टक्के इतके झाले […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या काळजीत भर टाकणारी बातमी पुन्हा एकदा समोर आली आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात ३० हजार ५३५ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात ११ हजार ३१४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. नव्या कोरोना रूग्णांमुळे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेटही ९० टक्क्यांच्या खाली आला आहे. महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता ८९.३२ टक्के इतके झाले आहे. मागील चोवीस तासांमध्ये राज्यात ९९ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.१५ टक्के इतका आहे.
मुंबईची चिंता वाढली ! दिवसभरात ३ हजार ६२ नवे कोरोना रुग्ण
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८३ लाख ५६ हजार २०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४ लाख ७९ हजार ६८२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख ६९ हजार ८६७ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर ९ हजार ६०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात २ लाख १० हजार १२० अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आज राज्यात ३० हजार ५३५ रूग्णांची भर पडल्याने राज्यात आत्तापर्यंत बाधित झालेल्या एकूण रूग्णांची संख्या २४ लाख ७९ हजार ६८२ इतकी झाली आहे.
कोरोना काळात फेअरवेल पार्टी, मुंबईतील कॉलेजला कारणे दाखवा नोटीस