महाराष्ट्रात Corona रुग्णसंख्येचा आलेख वाढताच, ३९ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह
महाराष्ट्रात दिवसभरात ३९ हजार ५४४ नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येचा आलेख हा गेल्या काही दिवसांपासून चढताच आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू शकतो अशी स्थिती आहे. दिवसभरात २३ हजार ६०० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण २४ लाख ७२७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे फेब्रुवारी […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात दिवसभरात ३९ हजार ५४४ नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येचा आलेख हा गेल्या काही दिवसांपासून चढताच आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू शकतो अशी स्थिती आहे. दिवसभरात २३ हजार ६०० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण २४ लाख ७२७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे फेब्रुवारी महिन्याआधी ९१ किंवा ९२ टक्क्यांवर होते जे आता ८५.३४ टक्के इतके झाले आहे. राज्यात दिवसभरात २२७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा सध्या १.९४ टक्के इतका झाला आहे.
मुंबईत लॉकडाऊन होणार का? BMC आयुक्त चहल यांची Exclusive मुलाखत
तुमची आमची चिंता वाढवणारी आकडेवारी. काळजी घ्या. 8 दिवसांत 2 लाख 80 हजार नवे कोरोना रुग्ण.@CMOMaharashtra @rajeshtope11#CoronavirusUpdate #MaharashtraCoronaUpdate #MaharashtraLockdown pic.twitter.com/99X4rxaGCR
— Mumbai Tak (@mumbaitak) March 31, 2021
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९७ लाख ९२ हजार १४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २८ लाख १२ हजार ९८० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७ लाख २९ हजार ८१६ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर १७ हजार ८६३ जण होम क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला ३ लाख ५६ हजार २४३ रूग्ण आहेत. आज राज्यात ३९ हजार ५४४ नवीन रूग्णांची नोंद झाली आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या ही २८ लाख १२ हजार ९८० झाली आहे.
लॉकडाऊन लागला तरी 10-12वीच्या परीक्षा होणारच!
आज नोंद झालेल्या एकूण २२७ मृत्यूंपैकी १२९ मृत्यू हे मागील ४८ तासांमधील ६१ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ३७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३७ मृत्यू पुणे १५, पालघर ५, जळगाव ४, जालना ३, गोंदिया २, ठाणे २, अहमदनगर १, औरंगाबाद १, नागपूर १, नांदे १, नाशिक १ आणि वाशिम १ असे आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई – ४९ हजार ९५३
ठाणे- ३९ हजार ६९२
पुणे- ६४ हजार २७७
अहमदनगर-९ हजार १०३
जळगाव-६ हजार ४२४
औरंगाबाद- १९ हजार ४६६
लातूर – ५ हजार ५४५
नांदेड- १२ हजार २६८
नागपूर ४६ हजार ३३३
प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतली तर पुण्यात आणि नागपूरमध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात ६४ हजारांपेक्षा जास्त रूग्ण तर नागपुरात ४६ हजारांपेक्षा जास्त रूग्ण अॅक्टिव्ह आहेत.