कल्याण-डोंबिवलीत बिनचेहऱ्याचे मतदार! ४ लाखांहून अधिक मतदारांचे फोटोच गायब
एकीकडे कल्याण-डोंबिवलीत महापालिका निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली असता मतदारांच्या दृष्टीने एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. कल्याण डोंबिवलीतील तब्बल 4 लाखांहून अधिक मतदारांचे यादीमध्ये छायाचित्रच नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या मतदारांच्या मतदानाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातही संबंधित पत्त्यावर राहत नसल्याने त्यातील दिड लाखांहून अधिक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची […]
ADVERTISEMENT
एकीकडे कल्याण-डोंबिवलीत महापालिका निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली असता मतदारांच्या दृष्टीने एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. कल्याण डोंबिवलीतील तब्बल 4 लाखांहून अधिक मतदारांचे यादीमध्ये छायाचित्रच नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या मतदारांच्या मतदानाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातही संबंधित पत्त्यावर राहत नसल्याने त्यातील दिड लाखांहून अधिक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
ADVERTISEMENT
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कल्याण पश्चिम (4 लाख 78 हजार मतदार), कल्याण पूर्व (3 लाख 57 हजार मतदार), कल्याण ग्रामीण (4 लाख 40 हजार मतदार) आणि डोंबिवली (3 लाख 72 हजार मतदार) असे चार विधानसभा मतदारसंघ मिळून एकूण 16 लाख 49 हजार 270 मतदार आहेत. त्यापैकी कल्याण पश्चिमेत 1 लाख 22 हजार, कल्याण पूर्वेत 92 हजार 192, कल्याण ग्रामीणमध्ये 82 हजार 364 आणि डोंबिवलीत 1 लाख 17 हजार 92 मतदार अशा एकूण 4 लाख 13 हजार मतदारांची यादीत छायाचित्रे नसल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 1 लाख 67 हजार 909 मतदारांची नावे मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर ते राहत नसल्याने वगळण्यात आल्याचे कल्याणचे प्रांताधिकारी विजय भांडे पाटील यांनी सांगितलं.
बोगस मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मतदारांचे फोटो असणे निवडणूक आयोगाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील मतदार याद्या फोटोसह अद्ययावत करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. तर आजपर्यंत कल्याण डोंबिवलीतील चारही विधानसभा मतदारसंघ मिळून 4 लाखांपैकी केवळ 7 हजार 770 मतदारांची छायाचित्रे गोळा करण्यात आल्याचेही प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले. छायाचित्रे नसणाऱ्या मतदारांनी संबंधित बीएलओकडे आपली छायाचित्रे जमा करण्याचे आवाहन करतानाच यादीतील पत्त्यावर मतदार न सापडल्यास ती नावे वगळण्याचा इशाराही प्रांताधिकारी भांडे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे अवघ्या 12 दिवसांत 4 लाख मतदारांची छायाचित्रे गोळा होतात की एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांची नावे यादीतून वगळली जातात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT