महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजारांहून अधिक Corona रूग्ण, 170 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 654 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर आज दिवसभरात 3301 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत 62 लाख 55 हजार 451 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.2 टक्के इतका झाला आहे. राज्यात दिवसभरात 170 मृत्यूंची नोंद […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 654 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर आज दिवसभरात 3301 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत 62 लाख 55 हजार 451 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.2 टक्के इतका झाला आहे. राज्यात दिवसभरात 170 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 32 लाख 56 हजार 24 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 47 हजार 442 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 92 हजार 733 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. 2337 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 51 हजार 574 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 4 हजार 654 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 64 लाख 47 हजार 442 झाली आहे.
Corona Curfew : रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागात पुन्हा लागणार ‘नाईट कर्फ्यू’?
मागील आठवड्यातील रूग्णसंख्या










