महाराष्ट्रात दिवसभरात 6 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांची नोंद, 231 मृत्यू
महाराष्ट्रात आज दिवसभरात 6 हजार 600 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात 7 हजार 431 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दिवसभरात 231 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 60 लाख 83 हजार 319 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.61 टक्के इतकं झालं आहे. […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात आज दिवसभरात 6 हजार 600 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात 7 हजार 431 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दिवसभरात 231 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 60 लाख 83 हजार 319 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.61 टक्के इतकं झालं आहे. दिवसभरात राज्यात 6 हजार 600 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे.
राज्यात दिवसभरात 231 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.1 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 77 लाख 60 हजार 862 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 96 हजार 756 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्याच्या घडीला राज्यात 4 लाख 79 हजार 553 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 3 हजार 289 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज रोजी एकूण 77,494 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत










