मुंबईत Corona चा कहर दिवसभरात ८ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह
मुंबईत दिवसभरात कोरोनाचा कहर पाहण्यास मिळाला आहे. आज दिवसभरात मुंबईत ८ हजार ६४६ कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात ५ हजार ३१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण ३ लाख ५५ हजार ६९१ रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८४ टक्के आहे. डबलिंग रेट ४९ […]
ADVERTISEMENT

मुंबईत दिवसभरात कोरोनाचा कहर पाहण्यास मिळाला आहे. आज दिवसभरात मुंबईत ८ हजार ६४६ कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात ५ हजार ३१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण ३ लाख ५५ हजार ६९१ रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८४ टक्के आहे. डबलिंग रेट ४९ दिवसांवर गेला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
#CoronavirusUpdates
1-Apr; 6:00pmPositive Pts. (24 hrs) – 8,646
Discharged Pts. (24 hrs) – 5,031
Total Recovered Pts. – 3,55,691
Overall Recovery Rate – 84%Total Active Pts. – 55,005
Doubling Rate – 49 Days
Growth Rate (25 Mar-31 Mar) – 1.38%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 1, 2021
मुंबईत लॉकडाऊन होणार का? BMC आयुक्त चहल यांची Exclusive मुलाखत
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील कोरोना बाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढते आहे. या बाधितांमध्ये लक्षणे नसलेल्या बाधितांची व सौम्य लक्षणं असलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना बहुतांशी घरी विलगीकरण करुन औषधोपचार दिले जातात. त्याआधारे ते पूर्णपणे बरे देखील होतात. गृह विलगीकरणात असलेल्या अशा प्रकारच्या बाधितांची लक्षणीय संख्या पाहता संबंधित रुग्ण, त्यांचे नातेवाईक यासह वैद्यकीय मंडळी आणि रुग्णशय्यांचे व्यवस्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे वॉर्ड वॉर रुम यांच्यासाठी महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने विविध सूचना समाविष्ट असलेले सुधारीत परिपत्रक लागू केले आहे.
गृह विलगीकरणासाठी पात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये जे रुग्ण कोविड चाचणी केल्यानंतर बाधित आढळले आहेत, अशा रुग्णांना घरी विलगीकरण करता येवू शकते. त्यासाठी









