रेल्वे बोगीतून चिमुकला दरवाजाच्या दिशेने पुढे धावत गेला, वाचवायला गेलेल्या आईचाही मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रेल्वेच्या डब्यातून प्रवास करत असताना आपला दीड वर्षाचा मुलगा नकळत धावत दरवाजाच्या दिशेने गेला असता त्याला वाचवण्यासाठी पुढे गेलेल्या आईचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी भंडारा येथील देव्हाडी – माडगी वैनगंगा पुलावर ही घटना घडली आहे. या घटनेत पुजा इशान रामटेके (वय २७), अथर्व इशान रामटेके (वय दीड वर्ष) या मायलेकांचा मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

मध्यप्रदेशातील रिवा येथे सैनिकी शाळेत इशान रामटेके हे रसायवशास्त्र हा विषय शिकवतात. सुट्टी संपल्यामुळे आपल्या कुटुंबासह नागपूरवरुन मध्य प्रदेशला जाण्यासाठी ते रात्रीच्या रेल्वे गाडीने निघाले होते. तुमसर रेल्वे स्थानकातून गाडी पुढे निघाली असताना पत्नीला लघुशंका लागल्यामुळे ती आपल्या मुलाला घेऊन शौचालयाच्या दिशेने गेली. त्यावेळी दीड वर्षाच्या अथर्वने नकळत दरवाजाच्या दिशेने धाव घेतली आणि काही कळायच्या आतच तो वैनगंगा नदीच्या पुलावरुन नदीत पडला.

आपल्या मुलाचा वाचवण्याच्या प्रयत्नात पुजा या देखील तो जाऊन गाडीच्या खाली कोसळल्या. या घटनेत मुलाचा पाण्यात बुडून तर पुजा यांचा मार लागून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

हे वाचलं का?

गुजरात: भल्या पहाटे सुरतमध्ये जीवघेणी दुर्घटना, 6 कामगारांचा गुदमरून मृत्यू; 25 जणांची प्रकृती चिंताजनक

दुसरीकडे बराच वेळ झाला तरी पत्नी आणि मुलगा परत न आल्यामुळे इशान यांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. परंतू ते न सापडल्यामुळे त्यांनी गोंदिया रेल्वे स्थानकात तक्रार नोंदवली. सोमवारी रेल्वे पोलिसांच्या टीमला पेट्रोलिंगदरम्यान दुपारी १२ वाजता पुजा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत तर लहानग्या अथर्वचा मृतदेह नदीत आढळून आला. पोलिसांनी या ठिकाणाचा पंचनामा करत दोन्ही मृतदेहांची ओळख पटवल्यानंतर पोस्टमार्टमसाठी मृतदेह तुमसर येथे पाठवले. या अपघातामुळे इशान रामटेके यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT