Sanjay Raut Letter: ‘हक्कभंग समिती उद्या घटनाबाह्य ठरू शकते’; राऊताचं उत्तर
Sanjay Raut । breach of privilege। maharashtra legislative assembly मुंबई : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग मांडण्यात आलेला आहे. याप्रकरणी अतुल भातखळकर आणि भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सूचना दिली होती. संजय राऊत यांना या प्रकरणी भूमिका मांडण्याची नोटीस बजावण्यात आली होती. राऊतांनी भूमिका मांडली असून, पुन्हा एकदा शिंदे आणि […]
ADVERTISEMENT

Sanjay Raut । breach of privilege। maharashtra legislative assembly
मुंबई : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग मांडण्यात आलेला आहे. याप्रकरणी अतुल भातखळकर आणि भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सूचना दिली होती. संजय राऊत यांना या प्रकरणी भूमिका मांडण्याची नोटीस बजावण्यात आली होती. राऊतांनी भूमिका मांडली असून, पुन्हा एकदा शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना डिवचलं आहे. (MP Sanjay Raut Reply to breach of privilege motion notice)
संजय राऊतांनी विधिमंडळ प्रधान सचिवांना पत्र पाठवलं असून, त्यांनी नेमण्यात आलेल्या हक्कभंग समितीवरच आक्षेप घेतला आहे.
संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना लिहिलेलं पत्र
सन्मानिय विधानसभा सदस्य अतुल भातखळकर व भरत गोगावले यांनी माझ्याविरुद्ध उपस्थित केलेल्या विशेषाधिकार तसेच अवमानाच्या सूचनेवर उत्तर देण्यासाठी आपण मुदत वाढवून दिलीत त्याबद्दल मी आपला आभारी आहे.