Mughal Garden : राष्ट्रपती भवनमधील ‘मुघल’ गार्डनचं नामांतर, नवं नाव काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mughal garden’s Name Change by Governmetn : राष्ट्रपती भवनाच्या (Rashtrapati Bhavan) मुघल गार्डनचे (Mughal Garden) नाव बदलण्यात आले आहे. आता ते ‘अमृत उद्यान’ (Amrut Garden) म्हणून ओळखले जाणार आहे. वास्तविक, राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन आपल्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. ते पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. (138 Types Rose) 138 प्रकारचे गुलाब, 10,000 पेक्षा जास्त ट्यूलिप बल्ब आणि 70 विविध प्रजातींच्या सुमारे 5,000 हंगामी फुलांच्या प्रजाती आहेत. हे उद्यान देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सर्वसामान्यांसाठी खुले केले होते, तेव्हापासून दरवर्षी वसंत ऋतूमध्ये (Rainy Season) हे उद्यान जनतेसाठी खुले केले जाते.

15 एकरात पसरलेल्या या उद्यानाची निर्मिती ब्रिटिश राजवटीत करण्यात आली होती. मुघल गार्डन हा देशाच्या राष्ट्रपती भवनाचा आत्मा आहे, अशी एक म्हण आहे. मुघल गार्डन्सचा एक भाग गुलाबांच्या विशेष प्रकारांसाठी ओळखला जातो. राष्ट्रपती भवन आणि मुघल गार्डन्सची रचना इंग्रज वास्तुविशारद सर एडवर्ड लुटियन्स यांनी केली होती.

संभाजीनगर नामांतर : जे सोबत आले नाहीत, त्यांची वाट लागणार – इम्तियाज जलील

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

माहिती देताना राष्ट्रपतींच्या उपप्रेस सचिव नाविका गुप्ता म्हणाल्या की, मुघल गार्डनमध्ये येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी सर्व झाडांजवळ क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत. यासोबतच आणखी एक बदल करण्यात आला आहे. त्यानुसार दररोज सुमारे 20 व्यावसायिक येथे मार्गदर्शक म्हणून काम करतील. येथे येणाऱ्या लोकांना वनस्पती आणि फुलांशी संबंधित माहिती देतील.

राष्ट्रपती पदाची निवडणूक दोनच उमेदवार का लढतात?

ADVERTISEMENT

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि रामनाथ कोविंद यांच्या काळात येथे चार बागा होत्या. मात्र अलीकडच्या काळात येथे अधिक बागा बांधल्या गेल्या आहेत. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या भागात राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनाच्या उद्यानाला अमृत उद्यान असे नाव दिले आहे.

ADVERTISEMENT

गार्डन अनेक भागात विभागले गेले

मुघल गार्डन अनेक भागात विभागले गेले आहे. यात रोझ गार्डन तसेच बायो डायव्हर्सिटी पार्क, हर्बल गार्डन, बटरफ्लाय, म्युझिकल फाउंटन, सनकेन गार्डन, कॅक्टस गार्डन, न्यूट्रिशनल गार्डन आणि बायो फ्युएल पार्क आहे. जिथे लोक फेरफटका मारताना विविध प्रकारची फुले पाहू शकतात. आता ही सर्व उद्याने एका नावाने ओळखली जातील आणि ते म्हणजे अमृत उद्यान. इथे तुम्हाला ट्यूलिप, मोगरा-मोतिया, रजनीगंधा, बेला, रात की रानी, ​​जुही, चंपा-चमेली अशी अनेक प्रकारची फुलं पाहायला मिळतील.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT