Mumbai Covid : मुंबईकरांना मोठा दिलासा! २४ तासांत कोरोना रुग्णसंख्येत मोठी घसरण
देशाची राजधानी दिल्लीत कोरोना प्रार्दुभावामुळे चिंताजनक स्थिती असताना आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत परिस्थिती सुधारत असल्याचं दिसत आहे. गेल्या आठवडाभरापासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असून, गेल्या २४ तासांत मुंबई साडेतीन हजारांच्या जवळपास रुग्ण आढळून आले आहेत. तर १० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं धडक दिल्यानं चिंता व्यक्त […]
ADVERTISEMENT

देशाची राजधानी दिल्लीत कोरोना प्रार्दुभावामुळे चिंताजनक स्थिती असताना आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत परिस्थिती सुधारत असल्याचं दिसत आहे. गेल्या आठवडाभरापासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असून, गेल्या २४ तासांत मुंबई साडेतीन हजारांच्या जवळपास रुग्ण आढळून आले आहेत. तर १० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं धडक दिल्यानं चिंता व्यक्त केली जात होती. त्यातच ओमिक्रॉन व्हेरियंटनेही भर टाकली होती. मात्र, दोन आठवड्यानंतर मुंबईत कोरोनाची लाट ओसरत असल्याचं दिसत आहे. गेल्या आठवडाभरापासून मुंबईत आढळून येणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे.
Omicron symptom : ओमिक्रॉनचं आणखी एक त्रासदायक लक्षण आलं समोर, कानावरही होतोय परिणाम
गेल्या २४ तासांत मुंबईत ३,५६८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २३१ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींची सख्या ९,९५,५६९ वर पोहोचली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेटही ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे.