कोपराच्या दुखापतीमधून Neeraj Chopra ला सावरण्यात मुंबईच्या डॉक्टरने बजावली मोलाची भूमिका
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने गोल्ड मेडलची कमाई करत संपूर्ण देशवासियांना आनंदाचे क्षण दिले. तब्बल १३ वर्षांनी भारताने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. नीरज चोप्राचा सुवर्णपदकापर्यंतचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. कठोर मेहनत, परिश्रम आणि सरावाच्या जोरावर नीरज चोप्राने इथपर्यंत बाजी मारली. मध्यंतरीच्या काळात नीरज चोप्राला दुखापतींनाही सामोरं जावं लागलं. २०१९ मध्ये नीरज चोप्राच्या […]
ADVERTISEMENT
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने गोल्ड मेडलची कमाई करत संपूर्ण देशवासियांना आनंदाचे क्षण दिले. तब्बल १३ वर्षांनी भारताने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. नीरज चोप्राचा सुवर्णपदकापर्यंतचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. कठोर मेहनत, परिश्रम आणि सरावाच्या जोरावर नीरज चोप्राने इथपर्यंत बाजी मारली. मध्यंतरीच्या काळात नीरज चोप्राला दुखापतींनाही सामोरं जावं लागलं.
ADVERTISEMENT
२०१९ मध्ये नीरज चोप्राच्या उजव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली. ज्यामुळे त्याला भाला फेकताना त्रास जाणवायला लागला. यानंतर मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयातील ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. दिनशॉ पारडीवाला यांनी नीरजवर शस्त्रक्रीया करुन त्याला सावरण्यात मोठी मदत केली होती.
“२०१९ साली नीरज चोप्रा दोहा येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. त्याच्या उजव्या हाताच्या कोपराजवळचे स्नायू दुखावल्या गेल्यामुळे भाला फेकणं त्याला जमत नव्हतं. या दुखापतीमुळे नीरजला त्यावेळी खूप वेदना होत होत्या. त्याचं कोपर हे एका विशिष्ठ प्रकारात येऊन अडकायचं ज्यामुळे त्याच्या हातातून भाला सुटायचा नाही.” अशी माहिती डॉ. पारडीवाला यांनी ‘मुंबई तक’ शी बोलताना दिली.
हे वाचलं का?
Tokyo Olympics : ना सोशल मीडिया, ना फोन हातात घेतला…वाचा Neeraj ने कसं केलं स्वतःला तयार?
३ मे २०१९ रोजी नीरजवर कोकिलाबेन रुग्णालयात शस्त्रक्रीया करण्यात आली. सुमारे दोन तास चालेल्या शस्त्रक्रीयेला नीरज चोप्राने चांगला प्रतिसाद दिला. या शस्त्रक्रीयेनंतर नीरज चोप्रा ४ महिने Rehab Process मधून गेला, यानंतर सर्व गोष्टी सुरळीत झाल्या आणि तो पहिल्याप्रमाणे भाला फेकू शकला. चोप्राव्यतिरीक्त डॉ. पारडीवाला यांनी क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, सायना नेहवाल यांच्यावरही शस्त्रक्रीया केली आहे.
ADVERTISEMENT
Tokyo Olympics : ती ५ मिनीटं, वाचा Neeraj Chopra सोबतच्या भेटीनंतर ‘मुंबई तक’च्या प्रतिनिधीला आलेला अनुभव
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT