Uddhav Thackeray : ''...तर मी विश्वजीतसाठी सांगली सोडली असती'', ठाकरे असं का म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

udhhav thackeray rally speech sangli lok sabha election 2024 vishwajit kadam chandrahar patil
पतंगराव मोकळा ढाकळा माणूस होता.माझ्याशी बोलताना वयाच अंतर जाणू दिलं नाही.
social share
google news

Uddhav Thackeray on vishwajeet kadam : स्वाती चिखलीकर ,  सांगली:  सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्यासाठी प्रयत्नाची शर्थ करूनही आमदार विश्वजित कदम यांच्या हाती निराशा आली आहे. या सर्व घडामोडीनंतर आज चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी सांगलीत सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला विश्वजित कदमांची देखील उपस्थिती होती. यावेळी सभेतून बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की,  जर मला कळालं असतं ना सांगली विश्वजीतला देतायत, तर मी त्याच दिवशी सांगली सोडली असती.ठाकरेंच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.  (udhhav thackeray rally speech sangli lok sabha election 2024 vishwajeet kadam chandrahar patil) 

सांगलीत चंद्रहार पाटलांच्या प्रचाराच्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. ''मी आज सगळ्यांच्या समोर सांगतो. जर मला पहिल्याच दिवशी कळालं असतं ना सांगली विश्वजीतला देतायत, मी त्याच दिवशी सांगली सोडली असती. कारण तेवढा अधिकार आणि प्रेम माझं तुझ्यावर आहे, असे ठाकरेंनी सांगितलं.  पतंगरावांना सुद्धा बाळासाहेबांकडे येताना पाहिले आहे. वयाच एक अंतर असतं. पतंगराव मोकळा ढाकळा माणूस होता.माझ्याशी बोलताना वयाच अंतर जाणू दिलं नाही. अगदी विश्वजीतशी ते कसे बोलायचे, तसे ते माझ्याशी बोलायचे, अशी आठवण देखील ठाकरेंनी यावेळी सांगितली. 

हे ही वाचा : पवार या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र काय..: मोदी

जर इथल्या काँग्रेसला आणि विश्वजीत तुला असं वाटतं असेल की, उद्या शिवसेना आमच्या भविष्याच्या आड येईल. अजिबात येणार नाही. इथलं भविष्य जे तुमचं आहे. ते भविष्य आम्ही ओरबाडून घ्यायला आलो नाही. पण माझ्या सांगलीकरांकडून जी जागा आम्ही ज्यांना सोबत दिली, त्यांनी ती जागा तुमच्याकडून हिसकावून घेतली आहे. ती हिसकावून पुन्हा घेण्यासाठी मी सांगलीत आलो आहे. ही सांगली मला जिंकायची आहे, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तुम्हाला आम्ही चंद्रहार एक नवीन मल्ल दिलेला आहे. हा लेचापेचा नाही आहे, डबल महाराष्ट्र केसरी आहे. अरे आपल्याला काय जातंय गर्दी करून कुस्ती बघायला. आपण बाजूला उभे राहून लढत पाहतो. पण त्यावेळी त्य़ांचा मैदानात घामटा जातो. ही साधी गोष्ट नाही आहे. काही जण म्हणतात हा पैलवान आहे,याचा राजकारणाशी काय संबंध? अहो पण मारूती माने होतेच ना, काही जण सिनेतारकांना, क्रिकेटपटूंना तिकीट देतायत. त्यांचा काय संबंध आहे राजकारणाशी? जे उमेवाराला मतदान करत असतात त्या सगळयांचा संबंध राजकारणाशी असतो, असे ठाकरे म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : पॉर्नस्टारवरून भाजपने घेरलं मग ठाकरेंनी सेक्स कँडलच काढलं बाहेर

    follow whatsapp

    ADVERTISEMENT