धक्कादायक ! कनिष्ठ अभियंत्यांनीच दिली होती दिपक खंबाईत यांच्या हत्येची सुपारी, बोरिवलीजवळ झाला होता हल्ला
काही दिवसांपूर्वी मीरा-भाईंदर महापालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खंबाईत यांच्यावर मुंबईच्या बोरिवली भागात अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात खंबाईत थोडक्यात बचावले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत हत्येची सुपारी देणाऱ्या सुत्रधारांचा शोध लावला आहे. खंबाईत यांच्यासोबत काम करणाऱ्या दोन कनिष्ठ अभियंत्यांनीच त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दोन्ही अभियंत्यांनी खंबाईत यांच्या […]
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी मीरा-भाईंदर महापालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खंबाईत यांच्यावर मुंबईच्या बोरिवली भागात अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात खंबाईत थोडक्यात बचावले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत हत्येची सुपारी देणाऱ्या सुत्रधारांचा शोध लावला आहे. खंबाईत यांच्यासोबत काम करणाऱ्या दोन कनिष्ठ अभियंत्यांनीच त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
ADVERTISEMENT
दोन्ही अभियंत्यांनी खंबाईत यांच्या हत्येसाठी २० लाखांची सुपारी दिली होती. इतकच नव्हे तर हत्येसाठी त्यांनी उत्तर प्रदेशातील दोन गुंडांना मुंबईत बोलावलं होतं. परंतु सुदैवाने खंबाईत या हल्ल्यात बचावले. पोलिसांनी या गोळीबाराचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन आतापर्यंत ६ आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होऊ शकते अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.
तपासादरम्यान दोन्ही आरोपी हे उत्तर प्रदेशला पळून गेल्याच कळताच मुंबई पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी एक पथक उत्तर प्रदेशला पाठवलं. ज्यानंतर भदोई येखून अमित सिन्हा आणि गाजीपुरा भागातून अजय सिंग या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. या दोन्ही आरोपींच्या चौकशीत कनिष्ठ अभियंता श्रीकृष्ण मोहिते आणि यशवंत देशमुख यांच्यासह माहिती अधिकार कार्यकर्ते राजू विश्वकर्मा आणि प्रदीप पाठक यांची नावं समोर आली. पोलिसांनी या चौघांनाही अटक केली आहे.
हे वाचलं का?
देशमुख आणि मोहिते हे दोन्ही अभियंते २००४ साली मीरा भाईंदर महापालिकेत नगररचना विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कामाला लागले. मात्र तेव्हापासून दोघांचीही बढती झालेली नव्हती. तसेच या दोघांनाही चांगली पोस्टींग मिळत नव्हती. या सर्वाला ते खंबाईत यांना जबाबदार धरत होते. म्हणूनत दोघांनीही माहिती अधिकार कार्यकर्ते राजू विश्वकर्माच्या साथीने खंबाईत यांच्या हत्येची सुपारी दिली.
२० लाखांच्या सुपारीपैकी १० लाख रुपये दोन्ही आरोपींना देण्यात आले होते. प्रत्यक्ष गोळीबार झाला त्यावेळी आरोपी अमित सिन्हा हा गाडी चालवत होता तर अजय सिंगने पाठीमागून गोळी चालवली. मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीने या सर्व आरोपींना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT