Mumbai Crime : तरुणीच्या हत्येचं गुढ उकलण्यात यश, प्रियकराने मित्राच्या मदतीने हत्या केल्याचं निष्पन्न
मुंबईच्या कुर्ला परिसरातील एका इमारतीच्या लिफ्टरुममध्ये २० वर्षीय तरुणीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. प्राथमिक चौकशीच या तरुणीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय. लग्नाचा तगादा लावल्यामुळे प्रियकराने आपल्या मित्राच्या मदतीनेच या तरुणीची हत्या केल्याचं समोर आलंय. पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. कुर्ला पश्चिमेतील […]
ADVERTISEMENT

मुंबईच्या कुर्ला परिसरातील एका इमारतीच्या लिफ्टरुममध्ये २० वर्षीय तरुणीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. प्राथमिक चौकशीच या तरुणीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय. लग्नाचा तगादा लावल्यामुळे प्रियकराने आपल्या मित्राच्या मदतीनेच या तरुणीची हत्या केल्याचं समोर आलंय. पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक केली आहे.
कुर्ला पश्चिमेतील एचडीआयएल कंपाउंडमधील एका रिकाम्या इमारतीच्या छतावर गुरुवारी २३ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला होता. बलात्कार करून तिची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा संशय होता.
Nagpur Crime : वयोवृद्ध महिला डॉक्टरची गळा चिरुन निर्घृण हत्या, शहरात खळबळ
पोलिसांनी परिसरातील बेपत्ता महिलांची माहिती घेण्यास सुरूवात केली. या तरुणीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारावर मृत तरुणीचा प्रियकर रेहान शेख (२०) आणि त्याचा मित्र फैजल शेख (२०) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने तरुणी लग्नासाठी आपल्यामागे सारखा तगादा लावत होती. परंतू आपल्याला तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. म्हणून मित्राच्या मदतीने तिची हत्या केल्याचं कबुल केलं.