मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वरील अपघाताची अंगारवर शहारे आणणारी दृश्ये
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर आज भीषण अपघात झाला. ट्रेलरने एकापाठोपाठ चार कारला धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्य झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर शनिवारी दुपारी मुंबईकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रेलरने तब्बल ४ गाड्यांना धडक दिल्यानं भीषण अपघाताची […]
ADVERTISEMENT


मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर आज भीषण अपघात झाला. ट्रेलरने एकापाठोपाठ चार कारला धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्य झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर शनिवारी दुपारी मुंबईकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रेलरने तब्बल ४ गाड्यांना धडक दिल्यानं भीषण अपघाताची घटना घडली. चालकाचं ट्रेलरवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.










