पतीचा मृत्यू होण्यासाठी पत्नी रोज करत होती ‘ही’ गोष्ट, मुंबईतली चक्रावून टाकणारी मर्डर मिस्ट्री
मुंबईतल्या एका मर्डर मिस्ट्रीमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या खुनाची उकल केली आहे. मात्र या घटनेत जे घडलं ते धक्कादायक होतं पोलिसांचं डोकं चक्रावून टाकणारं होतं. काय घडलं मुंबईत? कविता नावाची एक महिला आणि तिचा प्रियकर हितेश जैन या दोघांना पोलिसांनी कमलकांत शाह याच्या हत्येच्या आरोपात अटक केली आहे. कविता ही […]
ADVERTISEMENT
मुंबईतल्या एका मर्डर मिस्ट्रीमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या खुनाची उकल केली आहे. मात्र या घटनेत जे घडलं ते धक्कादायक होतं पोलिसांचं डोकं चक्रावून टाकणारं होतं.
ADVERTISEMENT
काय घडलं मुंबईत?
कविता नावाची एक महिला आणि तिचा प्रियकर हितेश जैन या दोघांना पोलिसांनी कमलकांत शाह याच्या हत्येच्या आरोपात अटक केली आहे. कविता ही कमलकांत शाहची पत्नी आहे. कविता आपल्या पतीला जेवणातून रोज थोडं थोडं विष देत होती. आर्सेनिक आणि थेलियम ती त्याच्या जेवणात मिसळत होती. त्यामुळे १७ दिवसांनी तिच्या पतीचा म्हणजेच कमलकांतचा मृत्यू झाला. कमलकांतला ३ सप्टेंबर २०२२ ला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
डॉक्टरांना संशय आल्याने पोलीस तक्रार
कमलकांत ज्या रूग्णालयात दाखल होता ते रूग्णालय होतं बॉम्बे हॉस्पिटल. या ठिकाणी कमलकांत शाह नावाच्या व्यक्तीला ३ सप्टेंबरला आणलं गेलं. त्यानंतर मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट ९ ने कविता नावाच्या महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. या महिलेवर आरोप आहे की तिने ४५ वर्षीय कमलकांत शाहला मारलं. या दोघांना सध्या ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत धाडण्यात आलं आहे.
हे वाचलं का?
डॉक्टरांना नेमका का संशय आला?
३ सप्टेंबरला २०२२ ला कमलकांतला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. १९ सप्टेंबर पर्यंत तो उपचार घेत होता. मात्र डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत. कमलकांतचा मृत्यू ज्या प्रकारे झाला ते डॉक्टरांनाच कुठेतही पटलं नाही. त्यामुळे डॉक्टरांनी उपचार सुरू असतानाच कमलकांतच्या रक्ताची हेवी मेटल टेस्ट केली. त्याचा जो अहवाल समोर आला त्यामुळे डॉक्टरांचा संशय आणखी गहिरा झाला. कारण रिपोर्टनुसार कमलकांतच्या शरीरात आर्सेनिक आणि थेलियम धातू या दोन्हीचं प्रमाण वाढलं होतं. कोणत्याही माणसाच्या शरीरात धातूचं प्रमाण वाढणं ही बाब सामान्य नसते. त्यामुळे डॉक्टरांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ही केस सांताक्रुझ पोलिसांकडे वर्ग केली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT