मुंबईचा राजा… गणेश गल्लीच्या बाप्पाचा फर्स्ट लूक!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

‘मुंबईचा राजा’ अशी ओळख असलेल्या गणेश गल्लीच्या राजाचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे.

शासन नियमानुसार गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा चार फूट उंच एवढीच बाप्पाची मूर्ती आणली आहे.

हे वाचलं का?

लालबागच्या राजासह गणेश गल्लीचा बाप्पा पाहण्यासाठी देखील दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पण यंदा भाविकांना ऑनलाइनच दर्शन घ्यावं लागणार आहे.

दरवर्षी गणेश गल्लीचा गणपती हा 20 ते 22 फूट उंचीचा असतो. मात्र, यंदा शासन नियमानुसार 4 फुटांचीच मूर्ती मुख्य मंडपात विराजमान करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

गणेश गल्लीचा गणपतीची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे देखावे. पण यंदा कोरोनाचा सावटामुळे हा सण साधेपणाने साजरा केला जाणार आहे.

ADVERTISEMENT

यंदा गणेश गल्ली मंडळाने फुलांच्या सजावटीने मुख्य मंडप सजवलं आहे. इथेच बाप्पाची मुख्य मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.

मुंबईचा राजा गणेश गल्ली गणपती मंडळाचं हे 94 वं वर्ष आहे.

कोरोनाची भीती आणि तिसऱ्या लाटेचं सावट यामुळे मुंबई पोलिसांनी परळ आणि लालबाग परिसरात गणेशभक्तांना प्रवेश दिला जाणार नसल्याचं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT