Raj Thackeray: मुंबईकरांनी खूप सहन केलं, आता मुंबईची लोकल सुरु करा: राज ठाकरे
मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या अद्यापही म्हणावी त्या प्रमाणात नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने अद्यापपर्यंत मुंबईतील लोकल सेवा सुरु केलेली नाही. पण आता मुंबईकरांनी खूप सहन केलं असून तातडीने मुंबईची लोकल सेवा सुरु करावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सविस्तर पत्र लिहून यासंबंधीची […]
ADVERTISEMENT

मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या अद्यापही म्हणावी त्या प्रमाणात नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने अद्यापपर्यंत मुंबईतील लोकल सेवा सुरु केलेली नाही. पण आता मुंबईकरांनी खूप सहन केलं असून तातडीने मुंबईची लोकल सेवा सुरु करावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सविस्तर पत्र लिहून यासंबंधीची मागणी केली आहे.
पाहा राज ठाकरे यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं आहे:
गेल्या 15 महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारने लागू केले आहेत. हे निर्बंध आपण सर्वच जण पाळत आलो आहोत. पण आजकाल हे निर्बंध नक्की कोणासाठी असा प्रश्न पडू लागला आहे. त्यातल्या त्यात सध्या मुंबई शहरासाठी जे निर्णय घेतले जात आहेत ते तर अनाकलनीय आहेत.