डोंबिवलीत कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची हत्या, तीन दिवसातली हत्येची दुसरी घटना
मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, ठाणे डोंबिवली एमआयडीसीच्या फेज १ मधील खंबाळपाडा रस्त्यावर असलेल्या एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची मंगळवारी रात्री धारदार शस्त्राने अज्ञात चोरट्यांनी हत्या केली आहे. चोरीच्या उद्देशाने ही हत्या केली असण्याचा संशय मानपाडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. मारेकऱ्यांनी कंपनीतून दीड लाखाचे सामान चोरून नेले आहे. ग्यानबहादुर भीमबहादुर गुरूम (वय-६४) मृत सुरक्षा रक्षकाचे नाव असून तो […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, ठाणे
डोंबिवली एमआयडीसीच्या फेज १ मधील खंबाळपाडा रस्त्यावर असलेल्या एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची मंगळवारी रात्री धारदार शस्त्राने अज्ञात चोरट्यांनी हत्या केली आहे. चोरीच्या उद्देशाने ही हत्या केली असण्याचा संशय मानपाडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. मारेकऱ्यांनी कंपनीतून दीड लाखाचे सामान चोरून नेले आहे.
ग्यानबहादुर भीमबहादुर गुरूम (वय-६४) मृत सुरक्षा रक्षकाचे नाव असून तो खंबाळपाडा रोडला विजय पेपर प्रॉडक्ट कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता. या संदर्भात जसवंतसिंग रणबहादुर ठाकूर (वय-५०) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खंबाळपाडा रस्त्याला विजय प्रॉडक्ट पेपर कंपनीत ग्यानबहादुर गुरूम हे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. कंपनीतून कास्य धातुचे गठ्ठे, तांब्याच्या धातुची वर्तुळे, पितळ, तांब्याचे तुकडे असा दीड लाख रुपये किमतीचा धातूचा साठा चोरट्यांनी चोरून नेला आहे.
डोंबिवली: क्रीडा प्रशिक्षकाकडून विद्यार्थिनीला अमानुष मारहाण, शारिरीक अत्याचार केल्याचं उघड