Nagaland मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने चमत्कार कसा केला? वाचा Inside Story

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nagaland assembly Election Result :

ADVERTISEMENT

गुरुवारी जाहीर झालेल्या ईशान्येकडील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं आहे. नागालॅंड (Nagaland) विधानसभेत राष्ट्रवादीला (NCP) ७ जागांवर विजय मिळाला आहे. तर ५ जागांवर दुसऱ्या क्रमाकांची मतं मिळाली आहेत. त्याचवेळी शरद पवार (Sharad Pawar) यांचा सहकारी पक्ष काँग्रेसला (Congress) मात्र भोपळाही फोडता आलेला नाही. (Nagaland Assembly Election Result : how did Sharad Pawar’s NCP make it possible)

राष्ट्रवादीच्या या यशाची कालपासून जोरदार चर्चा चालू आहे. नागालँडमध्ये १२ जागांसह भाजप इथे दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकाच्या म्हणजे ७ जागा मिळाल्या आहेत. भाजप सत्तेत सहभागी असल्याने राष्ट्रवादी हा विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. त्यामुळे आता पवारांचा पक्ष आता नागालँड विधानसभा सभागृहात विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याच्या तयारीत आहे.

हे वाचलं का?

PM मोदींची जादू ओसरली? ३ राज्यातील निकाल भाजपसाठी का चिंताजनक?

यापूर्वी २०१८ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने सहा जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. त्यांच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. त्यानंतर आता थेट सात जागांवर मजल मारली आहे. या सगळ्यामुळे पाच वर्षांत राष्ट्रवादीने काय केलं, की जी गोष्ट काँग्रेसला शक्य झाली नाही, ती गोष्ट पवारांच्या राष्ट्रवादीला कशी साधता आली? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ADVERTISEMENT

काय आहे नेमकं कारण?

याबाबत इंडियन एक्सप्रेसशी बोलताना राष्ट्रवादीचे सरचिटणीस नरेंद्र वर्मा म्हणाले, हे गेल्या १० वर्षातील ईशान्य भारतात आमच्या मेहनतीचे फळ आहे. मी गेल्या ४ महिन्यांपासून नागालँडमध्ये फिरलो आणि विशेषत: राज्याच्या पूर्वेकडील भागांवर लक्ष केंद्रित केलं. नागालँडच्या जनतेने आम्हाला त्यांची मते दिली आहेत आणि विरोधी पक्षनेत्याचा निर्णय घेण्यासाठी आम्ही आमच्या विधिमंडळ पक्षाची २ दिवसांत बैठक घेणार आहोत.

ADVERTISEMENT

Team India साठी आनंदाची बातमी, T20 वर्ल्ड कपमध्ये मिळाला थेट प्रवेश

याशिवाय शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्यांच्यासोबत ईशान्य भारतातील काँग्रेसचे बडे नेते दिवंगत पीए संगमा यांनीही काँग्रेस सोडून पवारांची साथ दिली. संगमा यांनी २०१३ पर्यंत नॅशनल पीपल्स पार्टीची स्थापना करेपर्यंत ईशान्येकडील सुत्र संभाळली. संपूर्ण प्रदेशात त्यांच्या प्रभावामुळे पक्षाला मतं मिळाली, ज्यामुळे राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यास मदत झाली.

याव्यतिरिक्त, पवार केंद्रीय कृषी मंत्री आणि त्यांचे सहकारी प्रफुल्ल पटेल केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री असताना पक्षाला नागालँडमध्ये काही प्रमाणात पाय रोवता आले. पवार यांचे जवळचे मित्र आणि सध्याचे लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील हे २०१३ ते २०१८ या काळात सिक्कीमचे राज्यपाल होते. या सगळ्यामुळे नागालँडच्या पूर्वेकडील भागात राष्ट्रवादीने सर्वाधिक विजय मिळवला, असल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT