नागपूर मेट्रो तोट्यात?; 8,680 कोटी रुपये खर्चूनही रायडरशिप मिळेना…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूर: हजारो कोटी रुपये खर्च करून नागपूर मेट्रोला प्रवाश्यांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मेट्रो ने आता आपली मेट्रो ट्रेन प्रवाश्यांना वाढदिवसासाठी किंवा अन्य सेलिब्रेशनसाठी उपलब्ध करून दिली आहे. नागपूर मेट्रोतर्फे प्रवाश्यांना आकर्षित करण्यासाठी ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ही संकल्पना राबविण्यात येत असुन या अंतर्गत प्रवासी वाढदिवस, किटी पार्टी, प्री वेडिंग शुट्स, फॅशन शो किंवा अन्य सेलिब्रेशनसाठी तीन डब्यांची मेट्रो 5 हजार रुपये देऊन बुक करू शकतात. यामध्ये नागपुरातील सीताबर्डी इंटरचेंज येथून खापरी स्टेशन अथवा लोकमान्य नगर स्टेशन पर्यंत प्रवासी मेट्रोमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत सेलिब्रेशन करू शकतात.

‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ पुन्हा सुरु

मध्यंतरी सेलिब्रेशन ऑन व्हील्स ही संकल्पना नागपूर मेट्रो तर्फे बंद करण्यात आली होती, कारण काही असामाजिक तत्त्वांनी सेलिब्रेशनच्या नावावर मेट्रोमध्ये गोंधळ घातला होता. परंतु नागपूर मेट्रो ने सेलिब्रेशन ऑन व्हील्स सेवा पुन्हा सुरू केली आहे.

नागपूर मेट्रो तोट्यात का आहे?

नागपूर मेट्रोच्या जनसंपर्क विभागाकडून मुंबई तकला जी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यानुसार विक डेज ला मेट्रोची रायडरशिप 75 हजार प्रतिदिन असल्याचा दावा मेट्रो ने केला आहे. परंतु नागपूर मेट्रोला प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर अपेक्षित रायडरशिप ही दीड लाख असल्याचे सांगितले गेले आहे. नागपूर मेट्रोचे सध्या 3 रिच सुरू झाले असून त्यात खापरी स्टेशन ते बर्डी स्टेशन आणि बर्डी स्टेशन ते लोकमान्य नगर स्टेशन, आणि सीताबर्डी स्टेशन ते झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशनचा समावेश आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नागपूर मेट्रोचे भूमिपूजन 21 ऑगस्ट 2014 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली आणि त्यामाध्यमातून नागपूर मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. केंद्र आणि राज्य सरकार अश्या दोघांच्या भागीदारी आणि विदेशी वित्तीय संस्थांचे कर्ज यातून मेट्रो उभी राहिली.

7 मार्च 2019 ला नागपूर मेट्रोचा पहिला रिच सुरू

एकूण 38.215 किलोमीटर च्या नागपूर मेट्रो प्रकल्पात एकूण 38 स्टेशन आहेत. नागपूर शहराची लोकसंख्या 35 लाखांच्या घरात आहे. पुढील 20 वर्षात नागपूरची लोकसंख्या आणि त्यात होणारी वाढ लक्षात घेता हजारो कोटी रुपये खर्चून नागपूर मेट्रो निर्माण करण्यात आली खरी परंतु प्रवाश्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने नागपूर मेट्रोला आता सेलिब्रेशन ऑन व्हील्स सारखे उपक्रम राबवून प्रवाश्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि त्याच माध्यमातून आपले उत्पन्न वाढीसाठी मोठी मेहनत करावी लागत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT