नागपूर : बालेकिल्ल्यात भाजपच्या हाती भोपळा; १३ पैकी ९ पंचायत समित्यांवर काँग्रेसचा झेंडा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूर : जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातच भाजपच्या हाती भोपळा लागला आहे. १३ पैकी एकाही पंचायत समितीमध्ये भाजपचा सभापती होऊ शकलेला नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

ADVERTISEMENT

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश :

त्याचवेळी काँग्रेसला मात्र नागपूरमध्ये घवघवीत यश मिळाले आहे. जिल्ह्यातील १३ पैकी ९ पंचायत समित्यांवर काँग्रेसचे सभापती निवडून आले आहेत. तर ३ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीच्या सभापतींनी झेंडा फडकविला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षालाही एका तालुक्यात यश मिळाले आहे. एका पंचायत समितीवर सभापती म्हणून निवडून आणण्यात शिंदे यांना यश मिळाले आहे. भाजपला फक्त दोन तालुक्यात उपसभापती पदावर समाधान मानावे लागले आहे.

हे वाचलं का?

काँग्रेसचे सभापती निवडून आलेल्या पंचायत समित्यांची नावं :

  • नागपूर ग्रामीण

  • कामठी

  • ADVERTISEMENT

  • सावनेर

  • ADVERTISEMENT

  • पारशिवनी

  • उमरेड

  • मौदा

  • कुही

  • भिवापूर

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती निवडून आलेल्या पंचायत समित्यांची नावं :

    • नरखेड

    • काटोल

    • हिंगणा

    याशिवाय बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला रामटेक पंचायत समितीत सभापती पद मिळाले. तर रामटेक, कुही आणि मौदा तीन तालुक्यात भाजपला उपसभापती पद मिळाले आहे. यातील मौदा आणि कुही येथील उपसभापतीपद चिठ्ठ्या टाकून मिळाले आहे. निवडणुकांपूर्वी पडद्यामागील घडामोडींमध्ये भाजपतर्फे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना संपर्क करण्यात आल्याच्या चर्चा होत्या. मात्र निकालाअंती या चर्चा फोल ठरल्या आहेत.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT