नागपूर : अल्पवयीन मुलीच्या मदतीने पतीची हत्या करुन आत्महत्या केल्याचा बनाव, पत्नी अटकेत
नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचणाऱ्या महिलेला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. निशा गजभिये असं या आरोपी पत्नीचं नाव असून तिने आपल्या अल्पवयीन मुलीच्या मदतीने गळा आवळून आपली पती धर्मेंद्रची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. 11 एप्रिल रोजी घडलेल्या घटनेत धर्मेंद्रचं आपली पत्नी निशासोबत कडाक्याचं भांडण झालं. यावेळी संतापलेल्या निशाने आपल्या अल्पवयीन […]
ADVERTISEMENT
नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचणाऱ्या महिलेला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. निशा गजभिये असं या आरोपी पत्नीचं नाव असून तिने आपल्या अल्पवयीन मुलीच्या मदतीने गळा आवळून आपली पती धर्मेंद्रची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
ADVERTISEMENT
11 एप्रिल रोजी घडलेल्या घटनेत धर्मेंद्रचं आपली पत्नी निशासोबत कडाक्याचं भांडण झालं. यावेळी संतापलेल्या निशाने आपल्या अल्पवयीन मुलीच्या सहाय्याने धर्मेंद्रचा गळा आवळून त्याची हत्या केली. या प्रकरणानंतर निशाने पारडी पोलीस ठाण्यात नवऱ्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं. पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटत असल्यामुळे त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली.
नागपुरात भीषण अपघात, बाइकवरील तिघांचा जागीच मृत्यू
हे वाचलं का?
शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर धर्मेंद्रची गळा आवळून हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पारडी पोलिसांनी तात्काळ निशाला अटक करुन अल्पवयीन मुलीची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे.
निशाचा नवरा हा ट्रक ड्रायव्हर होता, त्यामुळे तो सलग 8-10 दिवस घराबाहेर रहायचा. या दरम्यान निशाचं बाहेर प्रेमप्रकरण सुरु झालं. याची कुणकुण धर्मेंद्रला लागल्यानंतर त्यांच्यात वाद वाढायला लागले. या वादातूनच निशाने आपल्या मुलीच्या सहाय्याने पतीची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT