नागपूर : ८० वर्षीय वृद्धाचा अपघातात मृत्यू, पोलिसांनी ४ महिन्यांनी मयत वृद्धावरच दाखल केला गुन्हा
आतापर्यंत रस्ते अपघातात अनेकांचे जीव गेल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील. परंतू नागपूर पोलिसांनी चार महिन्यांपूर्वी घडलेल्या एका अपघातात मरण पावलेल्या ८० वर्षीय वृद्धावरच स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ८० वर्षीय जगदीश देऊळकर हे ३ ऑगस्टच्या दिवशी आपल्या पत्नीसोबत दुचाकी वाहनाने नागपूरमधील कांजी हाऊस ते राणी दुर्गावती चौक या मार्गाने जात होते. यादरम्यान […]
ADVERTISEMENT
आतापर्यंत रस्ते अपघातात अनेकांचे जीव गेल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील. परंतू नागपूर पोलिसांनी चार महिन्यांपूर्वी घडलेल्या एका अपघातात मरण पावलेल्या ८० वर्षीय वृद्धावरच स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
८० वर्षीय जगदीश देऊळकर हे ३ ऑगस्टच्या दिवशी आपल्या पत्नीसोबत दुचाकी वाहनाने नागपूरमधील कांजी हाऊस ते राणी दुर्गावती चौक या मार्गाने जात होते. यादरम्यान झालेल्या अपघातात जगदीश यांच्या पत्नी शेवंताबाई या थोडक्यात बचावल्या. परंतू जगदीश देऊळकर यांना उपचारादरम्यान आपले प्राण गमवावे लागले.
नागपूर : पार्किंगमधली कार बाहेर काढताना चालकाचं नियंत्रण सुटलं, अपघातात तरुण गंभीर जखमी
हे वाचलं का?
सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची नोंद अपघाती मृत्यू अशी केली होती. परंतू चौकशीत जगदीश देऊलकर हे हेल्मेट न घालता चुकीच्या दिशेने गाडी चालवत होते असं समोर आलं. त्यांचं हेच वागणं त्यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याचा निष्कर्ष पोलीस तपासात समोर आला आहे.
नागपूरच्या यशोधन नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटनेतील व्यक्ती ही ज्येष्ठ नागरिक होती. पोलीस तपासातमध्ये ते तांत्रिकदृष्ट्या स्वतःच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याचं समोर आलंय. परंतू त्यांचा आता मृत्यू झाल्यामुळे ही फाईल बंद करण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
बीड : भरधाव स्कॉर्पिओच्या वेगात दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT