नागपूर : हॉटेल ब्रिज इनमधल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दिल्ली, मुंबईतल्या तरूणी आढळल्या

मुंबई तक

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर नागपुरातील गणेश पेठ परिसरात असलेल्या ब्रिज इन हॉटेलवर नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने धाड घातली. या धाडीत पोलिसांना दिल्ली आणि मुंबईतील तरूणी नागपुरात येऊन सेक्स रॅकेट करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने या धाडीत प्रीतम दहीकर, त्याची पत्नी सीमा दहिकर,राज ईखान आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

नागपुरातील गणेश पेठ परिसरात असलेल्या ब्रिज इन हॉटेलवर नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने धाड घातली. या धाडीत पोलिसांना दिल्ली आणि मुंबईतील तरूणी नागपुरात येऊन सेक्स रॅकेट करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने या धाडीत प्रीतम दहीकर, त्याची पत्नी सीमा दहिकर,राज ईखान आणि समीर शेट्टे यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले असून यापैकी समीर आणि राज हे फरार आहेत..

कोल्हापूर: आयुर्वेद पंचकर्म मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, महिलेला अटक

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वरील सर्व आरोपी नागपुरातील गणेशपेठ परिसरामध्ये असलेल्या हॉटेल ब्रिज इन येथे महिनेवारीने रूम भाड्याने घेऊन दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथील तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यासाठी ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जात होत्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp