हिवाळी अधिवेशन 2022 : चार मुद्द्यांवरून विरोधक शिंदे-फडणवीसांना घेरणार!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनामुळे खंड पडल्यानं तब्बल दोन वर्षानंतर उपराजधानी नागपूरमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत आहे. 30 डिसेंबरपर्यंत अधिवेशन चालणार असून, हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच काही मुद्द्यांनी डोकं वर काढल्यानं सरकारला खिंडीत पकडण्याची विरोधकांना आयती संधी मिळाली आहे. सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी इरादे स्पष्ट केले असून, अधिवेशनात सरकारला घेरण्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकही होणार आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचा कस लागणार असून, अधिवेशनामुळे नागपुरचा राजकीय पारा वाढला आहे.

ADVERTISEMENT

हिवाळी अधिवेशनाला आजपासून (19 डिसेंबर) सुरूवात होत आहे. विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच पवित्रा स्पष्ट केला असून, शिंदे-फडणवीसांनीही विरोधकांच्या मुद्द्यांना उत्तर देत इरादे स्पष्ट केलेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून घमासान पाहायला मिळणार आहे.

हिवाळी अधिवेशन नागपूर : विरोधक हे मुद्दे उचलणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापुरुषांबद्दल केल्या गेलेल्या विधानांचा मुद्दा गाजत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भजापच्या काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल केलेल्या विधानांनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटली. त्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता जास्त आहे.

हे वाचलं का?

CM Shinde: अजितदादांचा ‘तो’ Video माझ्याकडे आहे: मुख्यमंत्री शिंदे

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अधिवेशन गाजवणार

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानावरून वाद चिघळला. हा मुद्दा विरोधकांकडून अधिवेशनात लावला जाईल, तसे संकेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आधीच दिलेत. या मुद्द्यांवरून विरोधक सातत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना उत्तर देण्यात कमी पडत असल्याचा पुर्नउल्लेख अजित पवारांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केला आहे. त्यामुळे शिंदेंची या मुद्द्यावरून विरोधक कोंडी करू शकतात.

ADVERTISEMENT

Ajit Pawar: विरोधी पक्षनेत्यांकडून सरकारचे वाभाडे, नागपुरात पवार-फडणवीसांमध्ये जुंपणार

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर दुपारी 4 वाजता ही बैठक होणार असून, या बैठकीला उद्धव ठाकरे, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

Devendra फडणवीसांचा प्लॅन तयार, विधानसभेत करणार मोठा गौप्यस्फोट?

हिवाळी अधिवेश विधान भवनावर धडकणार 61 मोर्चे

यंदाच्या हिवाळी अधिवेशनात तब्बल 61 मोर्चे विधान भवनावर धडकणार आहेत. त्यादृष्टीनेही तयारी करण्यात आलीये. आंदोलन व मोर्चे काढणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी दाभा परिसरात डिटेन्शन सेंटर तयार करण्यात आलं आहे. तसेच महत्त्वाच्या परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT