Nana Patole : “फडणवीसांनीच एकनाथ शिंदेंविरुद्ध याचिका दाखल केली होती”
एनआयटी अर्थात नागपूर सुधार प्रन्यासच्या भुखंड नियमितीकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. या प्रकरणात एकनाथ शिंदे यांचा बचाव करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केलाय. टीव्ही 9 या वृत्त वाहिनीशी बोलताना नाना पटोले म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहातही खोटं बोलत आहेत, असं चित्र आपण पाहतोय. एनआयटीचा झोपडपट्टी […]
ADVERTISEMENT

एनआयटी अर्थात नागपूर सुधार प्रन्यासच्या भुखंड नियमितीकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. या प्रकरणात एकनाथ शिंदे यांचा बचाव करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केलाय.
टीव्ही 9 या वृत्त वाहिनीशी बोलताना नाना पटोले म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहातही खोटं बोलत आहेत, असं चित्र आपण पाहतोय. एनआयटीचा झोपडपट्टी जमीन घोटाळा त्यावेळचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता. मग मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी त्यांचं समर्थन केलं होतं,’ असा दावा करत नाना पटोलेंनी फडणवीसांवर गंभीर आरोप केला आहे.
‘उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी स्वतः न्यायालयात याचिका दाखल केली होती. जसं सरकार बदललं, तशी त्यांनी याचिका मागे घेतली. त्यांचीच वकील सभागृहात देवेंद्र फडणवीस करत असल्याचं दिसत आहे,’ असं म्हणत नाना पटोलेंनी फडणवीसांना लक्ष्य केलं.
‘उद्धव ठाकरेंची होणार चौकशी?’, उमेश कोल्हे प्रकरणात रवी राणांचा गंभीर आरोप