Maharashtra: नाना पटोले राहणार की जाणार? काँग्रेस मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Nana Patol, Maharashtra Congress : 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा आणि महाराष्ट्रासह आगामी काही राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस तब्बल 8 राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याचं सांगितलं जात असून, यामुळे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं नाव चर्चेत आलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधून नाना पटोलेंविरोधात तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे गेलेल्या असल्यानं पटोले […]
ADVERTISEMENT

Nana Patol, Maharashtra Congress : 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा आणि महाराष्ट्रासह आगामी काही राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस तब्बल 8 राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याचं सांगितलं जात असून, यामुळे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं नाव चर्चेत आलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधून नाना पटोलेंविरोधात तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे गेलेल्या असल्यानं पटोले राहणार की जाणार? अशी चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसने 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा लोकसभा निवडणुकीबरोबरच इतर राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रादेशिक पातळीवर फेरबदल करण्याची चर्चा सध्या दिल्लीत काँग्रेसमध्ये सुरू असून, प्रदेशाध्यक्ष बदलण्याबद्दलही निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेस 8 राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलणार
2024 च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कामाला लागली असून, अलिकडेच रायपूरमध्ये झालेल्या अधिवेशनात पक्ष बांधणीच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. विविध राज्यात प्रादेशिक नेतृत्वात बदल केले जाण्याची शक्यता असून, 8 राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आलीये.
नाना पटोले राहणार की जाणार?
2024 मधील निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेसकडून पक्ष बांधणीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे विविध राज्यातील काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस नेतृत्वात बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे.