Nana Patole : 14 तारखेला महाराष्ट्रातील सरकार कोसळणार, पटोलेंचं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra political crisis in supreme court : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारबद्दल (Shinde-Fadnavis Govt) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Maharashtra congress President) नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठं विधान केलंय. नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील (Maharashtra) हे असंवैधानिक सरकार 14 तारखेला कोसळेल, असं नाना पटोले यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी म्हटलं आहे. (Nana Patole statement on Maharashtra political crisis, he Says Shinde government will collapse on 14 feb)

गेल्या सहा महिन्यांपासून राज्याचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचं भवितव्य अवलंबून असल्याचंही सातत्याने राजकीय नेते आणि कायदे तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येणार याचीच उत्सुकता सगळ्यांना आहे. अशात नाना पटोलेंनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाजूने लागेल असं म्हटलं आहे.

शिवसेनेच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबद्दल नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

अमरावती पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार लिंगाडे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार सभेत नाना पटोले यांनी हे विधान केलं. “महाराष्ट्रातील सरकार असंवैधानिक असून, राज्यपालांच्या आशीर्वादाने ते सत्तेवर आले आहेत. येत्या १४ तारखेला होणाऱ्या सुनावणीमध्ये शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाजूने निर्णय लागून हे सरकार कोसळणार आहे”, असं नाना पटोले यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार, नाना पटोलेंचं राजकीय भाकित

पुढे बोलताना नाना पटोले असंही म्हणाले की, “आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत अपात्रतेबाबत स्पष्ट तरतूद केलेली आहे. मी अध्यक्ष असतो, तर एका मिनिटाचा कार्यक्रम होता. शेड्यूल 10च्या तरतुदीनुसार हे सरकार लवकरच कोसळेल. महाराष्ट्रात केव्हाही निवडणुका लागू शकतात, 2024 ची वाट बघू नका”, असं राजकीय भाकित नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीबद्दल केलं.

Maharashtra political crisis hearing in supreme court : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल कधी लागणार?

बंडखोरी करून शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत. त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सरकार स्थापनेच्या निर्णयालाही आव्हान दिलं गेलेलं आहे. इतरही काही मुद्द्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत.

ADVERTISEMENT

16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्याय प्रविष्ट असून, पुढच्या महिन्यात म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी यावर सुनावणी होणार आहे. हे प्रकरण 5 सदस्यीय घटनापीठासमोर असून, त्याची सुनावणी 7 सदस्यी घटनापीठासमोर घेण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे. त्याबद्दलही 14 फेब्रुवारी रोजी युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. मात्र, 6 महिन्यांपासून कधी सुनावणी न झाल्यामुळे, तर कधी कमी वेळ सुनावणीमुळे या प्रकरणाचा निकाल लांबणीवर पडताना दिसत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल कधी लागणार, असा प्रश्न सध्या महाराष्ट्रात चर्चिला जातोय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT