नांदेड : १८ परप्रांतीय मजुरांची वेठबिगारीतून सुटका, पोलिसांची धकड कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नांदेडच्या कंधार येथून बालमजूरासह १८ जणांची पोलिसांनी सुटका केली आहे. मध्यप्रदेश मधील हे मजूर ऊसतोडणीचे काम करतात, परंतू या मजूरांची दिशाभूल करुन त्यांना कंधार येथील एका मुकादमाकडे ठेवण्यात आलं होतं. परंतू मुकादमाने ऊसतोडणीचे काम करुन मजूरी दिली नाही. शिवाय मारहाण करुन मजुरांना जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणात उस्माननगर पोलिसांनी शिताफीने मजूरांची सुटका करत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

नांदेड मधील दिपक नावाच्या व्यक्तीने मध्यप्रदेशातील मजुरांना विश्वासात घेऊन तुम्हाला वर्धा आणि नागपूर येथे ऊस तोडीचे काम देतो म्हणून नांदेडला कामासाठी आणले. यानंतर त्याने कंधार तालुक्यातील गोविंद केंद्रे या मुकादमाकडे तुम्ही काम करा असे सांगून मजुरांची दिशाभूल केली. मजुरांनी ऊस तोडणीचे काम केल्यानंतर मुकादमाकडे मजुरीचे पैसे मागण्यांसाठी गेले असता मुकादमाने आम्हाला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती मजुरांनी मुंबई तक शी बोलताना दिली.

कायद्याची थट्टा! पोलीस ठाण्यातच लाथाबुक्क्यांनी आणि पोलिसाच्या पट्ट्याने बेदम मारहाण

हे वाचलं का?

इतकच नव्हे तर मुकादमाने मजुरांना उपाशीपोटी ठेवत लहान मुलांनाही काम करायला भाग पाडलं. मुकादमाचा हा जाच सहन होत नसल्यामुळे मजुरापैकी एका मध्य प्रदेशातील आपल्या एका नातेवाईकाला वेळ पाहून संपर्क केला आणि आपल्यावर ओढावलेली परिस्थिती सांगितली. यानंतर मजुराच्या नातेवाईकांनी मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ही बाब त्यांच्या कानावर घातली. यानंतर बालाघाटच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटंनकर यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली.

यानंतर पोलिसांनी आपलं पथक पाठवून या सर्व कामगारांची मुकादमाच्या तावडीतून सुटका केली आहे. या प्रकरणात दोघांविरुद्ध उस्माननगर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि बालमजुरी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्य आरोपींचाही शोध सुरु केलाय. तसेच मुकादमाच्या तावडीतून सुटलेल्या कामगारांच्या जेवणाची सोय करत पोलिसांनी त्यांना मध्य प्रदेशला रवाना केलं आहे.

ADVERTISEMENT

नागपूर : …अन् भरधाव बोलेरो झाडावर जाऊन आदळली; चार मजूर महिलांवर काळाची झडप

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT