वाईट! युरोपीयन कमिशनने दिलेल्या तरंगत्या दवाखान्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष

मुंबई तक

–रोहिणी ठाकूर, नंदूरबार नंदूरबार जिल्ह्यात रस्त्यांसह आरोग्य व्यवस्थेची अगदी दुर्दशा झाली आहे. गेली कित्येक वर्ष या भागातील लोक मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. सरकारही त्यांच्या मूलभूत व्यवस्थेकडे दुर्लक्ष करतेय अशी स्थिती समोर येत आहे. नंदुरबारमधील १७ वर्षांपूर्वीचा तरंगता दवाखाना धोकादायक बनला आहे. चीमलखेडीतील नर्मदा काठावर असलेला हा तरंगता दवाखाना अनेकांसाठी जीवनदायी ठरला. परंतु, आज त्यांती अत्यंत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

रोहिणी ठाकूर, नंदूरबार

नंदूरबार जिल्ह्यात रस्त्यांसह आरोग्य व्यवस्थेची अगदी दुर्दशा झाली आहे. गेली कित्येक वर्ष या भागातील लोक मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. सरकारही त्यांच्या मूलभूत व्यवस्थेकडे दुर्लक्ष करतेय अशी स्थिती समोर येत आहे. नंदुरबारमधील १७ वर्षांपूर्वीचा तरंगता दवाखाना धोकादायक बनला आहे. चीमलखेडीतील नर्मदा काठावर असलेला हा तरंगता दवाखाना अनेकांसाठी जीवनदायी ठरला. परंतु, आज त्यांती अत्यंत दुर्दशा झाली आहे. जीवनदायी ठरलेल्या दवाखान्याकडे आज जीवघेण्या दवाखान्याच्या स्वरूपात पाहिलं जात आहे. कारण, दवाखान्याच्या दुरुस्तीचा विचारही आरोग्य विभागाने सोडून दिल्याचे चित्र आहे.

‘…आणि मग मी दाखवतो’, संतापलेल्या संजय राऊतांचं नारायण राणेंना चॅलेंज

नंदूरबार जिल्हातील आरोग्य यंत्रणेला युरोपीयन कमीशनची तरंगत्या दवाखान्यांची भेट…

युरोपीयन कमीशनने 2005साली दोन तरंगत्या दवाखान्यांची आरोग्य यंत्रणेला भेट दिली होती. नर्मदा काठावर अतिदुर्गम भागात वसलेल्या आदिवासी बांधवांना आरोग्य सुविधा पुरवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. परंतु सध्याची परिस्थिती पाहता तरंगते दवाखाने अंतीम घटका मोजत असल्याचे चित्र आहे. गेल्या १७ वर्षांपासून दुरूस्ती न झाल्याने तरंगत्या दवाखान्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

नंदूरबारमधील आरोग्य यंत्रणेला युरोपीयन कमीशनने दिलेल्या दोन दवाखान्यांच्या भेटींपैकी एक दवाखाना २०१५साली बुडाला. दवाखाना बुडाला असला तरी आज तागाईत प्रशासनाने त्याला बाहेर काढण्याची तसदी देखील घेतली नाही. पाण्याबाहेर काढून त्याची स्थिती आरोग्य यंत्रणेने कधीही तपासली नाही. तर दुसरीकडे चिमलखेडी येथे तैणात असलेल्या तरंगत्या दवाखान्याची अवस्था आजच्या परिस्थितीत बिकट झाली आहे. यातील विद्युत व्यवस्था बंद पडल्याने वैद्यकीय पथकाला रात्री अपरात्री रुग्ण आल्यास बॅटरीच्या उजेडात रुग्णांना तपासावे लागते.

चिमलखेडी नजीकच्या कित्येकांसाठी तरंगता दवाखाना हा एकच आरोग्य सेवेचा मूलभूत पर्याय!

चिमलखेडी येथे तैणात तरंगता दवाखाना जवळपास परिसरातल्या ०९ खेडे आणि पन्नासहुन अधिक पाड्यांसाठी कार्यरत आहे. यावरील पथकाने सोमवार ते शनिवार मुक्कामाचे एक वेळापत्रक तयार केले आहे त्यानुसार प्रत्येक गावाच्या काठावर हा तरंगता दवाखाना पोहचुन याठिकाणी आरोग्य सेवा पुरवत आहे. अनेक गावांना येण्यासाठी रस्ताच नसल्यानं हा दवाखाना आपल्या आरोग्यासाठी सर्व काही असल्याचे नागरीक सांगत आहेत. अशा स्थितीत या धोकादायक तरंगत्या दवाखान्याचा वापर करुन आरोग्य यंत्रणा मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देणार का असाच काहीसा प्रश्न निर्माण होत असतांनाच, आरोग्यसेवा अधिक बळकटीची गरज व्यक्त होत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp