शेंबडा आमदार म्हणत नारायण राणेंची टीका; केसरकरांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी मंत्री तथा शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांच्यात पुन्हा एकदा वाक् युद्धाची ठिणगी पडली. सावंतवाडीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणे यांनी दीपक केसरकरांना शेंबडा आमदार म्हणत लक्ष्य केलं. त्यानंतर दीपक केसरकरांनीही राणे यांना चोख प्रत्युत्तर दिलं. नारायण राणे काय म्हणाले? सावंतवाडी येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यकर्ता […]
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी मंत्री तथा शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांच्यात पुन्हा एकदा वाक् युद्धाची ठिणगी पडली. सावंतवाडीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणे यांनी दीपक केसरकरांना शेंबडा आमदार म्हणत लक्ष्य केलं. त्यानंतर दीपक केसरकरांनीही राणे यांना चोख प्रत्युत्तर दिलं.
नारायण राणे काय म्हणाले?
सावंतवाडी येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नारायण राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला. “सरकारकडे रस्त्यांसाठीही पैसे नाहीत. आता 2000 कोटींचा प्रकल्प येतोय. कोण आणतोय उद्धव ठाकरे का सुभाष देसाई? का हा केसरकर? काय औकात आहे? कसला शेंबडा आमदार निवडून देता. विधानसभेत साधं बोलता येत नाही.”
“सभागृहात एकदा मी त्यांना प्रश्न विचारला होता. त्यांनी कागद शोधण्यात बराच वेळ घालवला. चष्मा नाकाच्या टोकापर्यंत आला होता. पडायचाच बाकी होता. मग उत्तर द्यायला लागला. मला दया आली. मी म्हणालो, तुम्ही बसा, मला उत्तर नकोय. त्यांनाही खाली बसण्यास सांगितलं.”
