Narayan Rane यांना मुख्यमंत्र्याबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबाबतच्या 4 FIR मध्ये कोणताही दिलासा नाही

विद्या

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात चार FIR दाखल करण्यात आल्या होत्या. यापासून कोणताही दिलासा नारायण राणेंना अद्याप मिळालेला नाही. बॉम्बे हायकोर्टाने या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. काय म्हणाले होते नारायण राणे? जन आशिर्वाद यात्रेदरम्यान रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाडमध्ये केंद्रीय मंत्री […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात चार FIR दाखल करण्यात आल्या होत्या. यापासून कोणताही दिलासा नारायण राणेंना अद्याप मिळालेला नाही. बॉम्बे हायकोर्टाने या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोणताही दिलासा दिलेला नाही.

काय म्हणाले होते नारायण राणे?

जन आशिर्वाद यात्रेदरम्यान रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाडमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत (CM Uddhav Thackeray) वादग्रस्त टीका करणं चांगलंच भोवू शकतं. मुख्यमंत्र्यांचा स्वातंत्र्यदिनी व्हायरल झालेल्या व्हीडिओचा आधार घेत नारायण राणेंनी.. ‘मी बाजूला असतो तर कानाखाली चढवली असती.’ असं वक्तव्य केलं.

या मुख्यमंत्र्यांना देशाचा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव हेच माहिती नाही. 15 ऑगस्टला राज्यातील जनतेला उद्देशून भाषण करत असताना उद्धव ठाकरे मागे उभे असलेल्या मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना विचारतात हिरक महोत्सव आहे ना? मी त्या जागी असतो तर कानाखाली चढवली असती. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी हे किती चीड आणणारी गोष्ट आहे.’ असं वक्तव्य राणेंनी महाडमध्ये केले होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp