Shivsena मधे असताना नारायण राणेंचा अनुभव जास्त होता, नंतर काय झालं माहित नाही-संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेत असताना नारायण राणेंचा अनुभव जास्त नंतर काय झालं माहित नाही. शिवसेनेत असताना मंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलं होतं, त्याचं कारण बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी त्यांच्यावर लक्ष ठेवायला असं म्हणत संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी मुंबई तकला विशेष मुलाखत दिली त्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलं.

नारायण राणेंवर लक्ष ठेवायला आधी बाळासाहेब ठाकरे होते आता मोदी लक्ष ठेवतील की त्यांच्यावर असं जेव्हा संजय राऊत यांना विचारलं तेव्हा संजय राऊत म्हणाले की मोदीजी लक्ष ठेवतील पण आता त्यांच्यासाठीही हा नवीन अनुभव असणार आहे. पंतप्रधान माणसांमधल्या क्षमता बघूनच त्यांना मंत्रिपदी नेमतात. पण जर त्यांना त्या व्यक्तीचा तसा अनुभव आला तर मंत्रिपदावरून हटवतात. प्रकाश जावडेकरांचंच उदाहरण पाहा. रविशंकर प्रसाद यांनाही त्यांनी हटवलं, तसंच डॉ. हर्षवर्धन यांनाही राजीनामा देण्यास सांगितलं. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी बऱ्याच जणांना घरी जावं लागलं हेपण विसरता कामा नये असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांच्या मंत्रिपदाविषयी विचारलं असता संजय राऊत म्हणाल की, ‘केंद्रात मंत्री होत असतात, मंत्री जात असतात, मंत्री येतात नवीन जबाबदाऱ्या मिळतात हे सर्व ठीक आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सरकारमधले पत्ते नव्याने पिसले आहेत. काही जुने पत्ते गेले. आता काही नवीन पत्ते आणले त्यामध्ये नक्कीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जे शिवसेनेचे होते ते माजी मुख्यमंत्री म्हणजेच नारायण राणे यांना घेतले आहे आणि त्यांना लहान उद्योग मध्यम उद्योग त्याचे खाते दिलं आहे. ते काम करतील त्यांच्यावर जबाबदारी राजकारण करण्याची नाही. त्यांच्यावर किंवा कुठल्याही मंत्र्यावर जबाबदारी आहे तिचे काम करण्याची, जेव्हा तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेतात ती शपथ राज्याची असेल तेव्हा केंद्रातील मंत्रीपदाची शपथ असेल जी तुम्ही घटनेला स्मरून जमा असते ती गोपनीयतेची असते आणि देशाच्या सेवेची असते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंतप्रधानांनी नारायण राणेंना जबाबदारी दिलेली आहे. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो या देशाचे उद्योग मंत्री हे पियुष गोयल आहेत आणि त्यानंतर उद्योग खात्यामध्ये त्यांनी अनेक असे फाटे फोडले आहेत. अवजड उद्योग खातं, लघु उद्योग सूक्ष्म उद्योग, मायक्रो उद्योग हे नारायण राणे यांना दिलेलं आहे. आता महाराष्ट्रात सूक्ष्म उद्योग किती येतात आणि कोकणामध्ये विदर्भामध्ये किती येतात हे बघू. हा विषय संपूर्ण देशाचा आहे. संपूर्ण देश नारायण राणे यांना समजून घ्यावा लागेल त्यानुसार देशांमध्ये काही नवीन धोरण आणावं लागेल. रोजगार निर्माण करण्याचं आव्हान फार मोठं असतं, त्या लहान उद्योगांमधला रोजगार कोरोना काळात नष्ट झाला आहे. दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे आर्थिक चक्र मंदावलं आहे. ही महामारी फक्त आरोग्यविषयक नाही, तर आर्थिक महामारी सुद्धा झाली. या निमित्ताने अर्थव्यवस्था कोसळलेली आहे. लहान उद्योग पूर्णपणे मातीला मिळालेले आहेत कोट्यावधी लोक आज शहरातून गावाकडे परतलेले आहेत त्यांना काम नाही. सूक्ष्म उद्योग हा शहरात फक्त नसतो तो ग्रामीण भागात सुद्धा असतो या सर्व संबंधी हे नवीन मंत्री काय करतात त्याच्यावरही लक्ष असणार आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT