एका हाती पोस्टर एका हाती गम घेऊन महाराष्ट्रात फिरा, तीच तुमची लायकी; नारायण राणेंनी शिवसेनेला सुनावलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जिल्हा बँकेवर सत्ता माझी नाही तर भाजपची आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता आणि देवदेवता यांच्यामुळे ही सत्ता इथे आली आहे. नितेश राणे यांनी घेतलेली मेहनत, भाजपच्या कार्यकर्त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही सत्ता मिळवू शकलो. ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक देण्यात आली आहे. या विजयाचं श्रेय इथली जनता आणि कार्यकर्त्यांना आहे. हा प्रचंड विजय आहे. सिंधुदुर्गाचा विजय माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे असं आज नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

मुंबईत जी नितेश राणेंविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली त्याबद्दल विचारलं असता नारायण राणेंनी त्यावरूनही शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. ‘हे पोस्टर लावण्याच्याच लायकीचे आहेत. एका हातात गम दुसऱ्या हातात पोस्टर लावत फिरा महाराष्ट्रभर. हे ना बँकेवर राज्य करू शकतात ना महाराष्ट्रात’ असा टोला नारायण राणेंनी शिवसेनेला लगावला आहे.

सिंधुदुर्ग: नितेश राणे 2 दिवसांनी फेसबुकवर अॅक्टिव्ह, शेअर केला फोटो; म्हणतात ‘गाडलाच..’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय आहे पोस्टर प्रकरण?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमीत्ताने सुरु झालेल्या राजकारणात पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष राज्याला पहायला मिळतो आहे. भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर नितेश राणेंविरोधात मुंबईत पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

मुंबईच्या गिरगाव, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स परिसरात ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. आमदार नितेश राणेंचा फोटो लावून त्याखाली, हरवले आहेत शोधून देणाऱ्याला एक कोंबडी बक्षीस दिलं जाईल असा मजकूर लिहीण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

कणकवलीमध्ये नारायण राणे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालानंतर पोहचत पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. नको असलेले, ज्यांचे चेहरे पाहवत नाहीत अशा लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून आमचा जिल्हा निवडणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. आता आमचं लक्ष महाराष्ट्रात सत्ता आणण्याकडे आहे असंही वक्तव्य नारायण राणेंनी केलं आहे.

आम्ही असे राजकारणी आहोत जे आम्ही गड न जाऊ देता आम्ही सगळंच जिंकतो. राजन तेलींची वर्णी पुढे लावता येईल ना.. त्याची चिंता करू नका. 36 मतं मिळत नाहीत असे लोक विधानसभा मारण्याच्या गोष्टी करत आहेत. महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि चांगल्या सरकारची गरज आहे. सध्या राज्यात मुख्यमंत्रीच नाही. या राज्याला तेरा कोटी जनतेला सुखाची आणि समृद्धीची परिस्थिती निर्माण झाली पाहिजे त्यामुळेच आमचं लक्ष्य महाराष्ट्र सरकार आहे असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT