Mazi Ladki Bahin Yojana: Aaadhar Seeding हवंच नाहीतर 4500 रुपये...
Mazi Ladki Bahin Yojana Seeding: माझी लाडकी बहीण योजनेसाठी आधार सीडिंग असणं गरजेचं आहे. जाणून घ्या नेमकं कसं करायचं ते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आधार सीडिंग म्हणजे नेमकं काय

डी.बी.टी. इनेबल करणं आवश्यक

आधार कार्ड बँकेशी लिंक करावे लागेल
How to Mazi Ladki Bahin Yojana: Aaadhar Seeding: मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत जवळजवळ 2 कोटींहून अधिक अर्ज आले आहेत, आतापर्यंत या योजनेअंतर्गत अनेक महिलांना 3000 रुपये देखील मिळाले आहेत. तर सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. त्यांना आता तब्बल 4500 रुपये मिळणार आहेत. आता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. पण असं असलं तरी ज्या महिलांच्या बँक खात्यात आधार सीडिंग असेल त्यांनाच हे पैसे मिळतील. अन्यथा त्यांना पैसे मिळणार नाही.
आता आधार सीडिंग म्हणजे नेमकं काय? ते कसं अपडेट करावं त्यानंतर कोणती प्रक्रिया पार पाडावी असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतील. तर त्याच प्रश्नांची उत्तरं आम्ही आपल्याला देणार आहोत.
माझी लाडकी बहीण योजना आधार सीडिंग म्हणजे काय? (Mazi Ladki Bahin Yojana Aaadhar Seeding)
माझी लाडकी बहीण योजनेचे पेमेंट पाठवल्यानंतरही अनेक भगिनी तक्रार करतात की लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झालेसा नाही, तर अशा लाभार्थ्यांना प्रथम त्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक करावे लागेल, आणि डी.बी.टी. इनेबल करणं आवश्यक आहे. आधार सीडिंग आणि डीबीटी स्टेट्स हे नेमकं कसं तपासायचं हे आता आपण जाणून घेऊया.
माझी लाडकी बहीण योजना आधार सीडिंग कसे करावे? (How to get Mazi Ladki Bahin Yojana Aadhaar Seeding)
माझी लाडकी बहीण योजना आधार सीडिंग करण्यासाठी खाली दिलेल्या महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो करा?