Baramati Crime: रूमवर नेलं, दारू पाजली... बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींवर पुण्यात गँगरेप!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बारामतीच्या दोन अल्पवयीन मुलींवर पुण्यातील हडपसरमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना

point

अल्पवयीन मुली आणि आरोपींची पूर्वीची मैत्री होती

point

पीडित मुलींसोबत नेमकं काय घडलं?

Crime News : पुणे : बदलापूर अत्याचार प्रकरण शांत होत नाही तोच आता बारामतीच्या दोन अल्पवयीन मुलींवर पुण्यातील हडपसरमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नववीत शिकणाऱ्या दोन मुलींसोबत हा संतापजनक प्रकार घडला आहे. आरोपींनी मुलींना रुमवरून नेलं, त्यानंतर त्यांना दारू पाजण्यात आली. मग तिन्ही नराधम आरोपींनी मुलींवर आळीपाळीने बलात्कार केला. घडलेला सगळा प्रकार पीडित मुलीने आईला फोन करून सांगितला. त्यानंतर बारामती आणि हडपसर पोलिसांच्या मदतीने घटनेचा भांडाफोड करण्यात आलाय. (two minor girls from baramati were gang raped after drinking alcohol shocking incident in pune hadapsar)

पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली असून अन्य एका फरार आरोपीचा कसून शोध घेतला जातोय. ज्ञानेश्वर भरत आटोळे (वय २७, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय २०, रा. बयाजीनगर, रुई, बारामती), यश ऊर्फ सोन्या शिवाजी आटोळे, (वय २१, रा. सावळ, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा : Vishwakarma Yojana : 'लाडकी बहीण'नंतर लखपती व्हायची सुवर्णसंधी, काय आहे 'ही' योजना?

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुली आणि आरोपींची पूर्वीची मैत्री होती. याच मैत्रीचा फायदा घेत आरोपींनी मुलींना बारामतीहून पुण्याच्या हडपसरमध्ये आणलं. त्यानंतर एकत्र आलेल्या चार आरोपींनी दोन्ही मुलींवर आळीपाळीने गँगरेप केला. बारामती व हडपसर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींवर दोन वेगवेगळे एफआयआर दाखल करण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पीडित मुलींसोबत नेमकं काय घडलं?

बारामती येथील दोन अल्पवयीन मुली या गेल्या शनिवार (१४ सप्टेंबर) पुण्यात आल्या होत्या. याची माहिती त्यांनी घरी कुणालाही सांगितली नव्हती. दरम्यान मुली घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्या हरवल्याची तक्रार बारामती पोलिस ठाण्यात दिली होती. बेपत्ता झालेल्या या मुली मैत्रिणी असून त्या दोघी वेगवेगळया शाळेत शिक्षण घेत होत्या. बस पकडून त्या पुण्यात आल्या होत्या. त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे या त्यांच्या मित्राशी संपर्क केला. आटोळेने दोघींना हडपसर येथील त्याच्या खोलीवर बोलवले. याची माहिती त्याने त्याच्या मित्रांना देखील दिली. आटोळे हा त्याच्या एका आणखी एका मित्राला घेऊन पुण्यातील हडपसर येथे खोलीवर आणले.

हेही वाचा : PM Modi: PM मोदींची थेट मराठीतून टीका, म्हणाले.. 'काँग्रेसला तर गणपती पुजेबाबतही..'

त्याने मित्रांसोबत या मुलींना त्याच्या एका मित्राच्या खोलीवर नेले. या ठिकाणी त्यांनी दोन मुलींना दारू पाजली. यानंतर मुली नशेत असताना चौघांनी त्यांच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपींनी मुलीला सोडून दिले. मुली सकाळी हडपसर बसस्टॉपवर आल्या. यावेळी त्यांनी एका व्यक्तीच्या फोन वरून घरी फोन केला. यावेळी मुलीच्या आईने फोन उचलला. तिने तिच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT