Big Boss Marathi: '...म्हणून मी निक्कीच्या थोबाडीत मारली', आर्या जाधवचा मोठा खुलासा

अजय परचुरे

ADVERTISEMENT

आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या का मारली थोबाडीत?
आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या का मारली थोबाडीत?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बिग बॉस मराठी पाचव्या सीझनची आर्या जाधव मुंबई Tak च्या न्यूजरूममध्ये

point

आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या का मारली थोबाडीत?

point

बिग बॉसच्या घरातील किस्से मुंबई Tak वर

Aarya Jadhav Interview: मुंबई: बिग बॉस मराठीच्या पाचवा सीझन हा वेगवेगळ्या कारणांमुळे कायमच चर्चेत आहे. मात्र, मागील आठवड्यात रॅपर आर्या जाधव हिने अभिनेत्री निक्की तांबोळीच्या थेट कानशिलात लगावत घरात मोठा राडा केला. ज्यानंतर बिग बॉसने तिला थेट बाहेरचा रस्ता दाखवला. पण आपण असं पाऊल का उचललं, ती घटना का घडली या सगळ्याबाबत आर्या जाधव हिने मुंबई Tak ला दिलेल्या Exclusive मुलाखतीत उलगडा केला आहे. (bigg boss marathi 5 i slapped nikki tamboli for this reason mumbai tak exclusive interview with aarya who was kicked out by bigg boss)

निक्की तांबोळी ही घरात वर्चस्व गाजवत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. त्यामुळे पहिल्यापासूनच आर्या जाधव आणि तिच्यात खटके उडत असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र, मागील आठवड्यात त्यांच्यातील वाद हा एवढा टोकाला पोहचला की, आर्याने थेट निक्कीच्या थोबाडीतच मारली. याच सगळ्याबाबत निक्की मुंबई Tak सोबत बोलताना नेमकं काय म्हणाली वाचा सविस्तर.

हे ही वाचा>> Bigg Boss Marathi : निक्कीला मारहाण केल्याने आर्या घराबाहेर? बिग बॉसची कठोर शिक्षा

'...म्हणून निक्कीच्या कानाखाली मारली'

'रागात सहसा आपण विचारच करत नाही. मी कधी ठरवलं नाही की, आता आपण निक्कीला थोबाडीत मारायची आहे. मी तर ते ठरवलं नव्हतं.. आता काय झालं होतं ही खरं तर दोन महिन्यांची कहाणी आहे.' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'मी सातव्या आठवड्याला बाहेर आली आहे. सात आठवड्यापासून जर पाहिलं तर सुरुवातीला ट्रेनचा जो टास्क होता ज्यामध्ये तिचं नख लागलेलं.. मीच नाही तर बाकीचे मुलं मुली.. त्यांना काही ना काही इजा व्हायचीच. तिच्याकडून नेहमीच शारीरिक हिंसा झालेली आहेच. तसं घडतंच होतंय यासोबतच तिचं तोंड चालतच होतं.'

हे ही वाचा>> Aarya Jadhao : ''...तर बिग बॉसमध्ये पुन्हा परतणार'', Insta लाईव्हवर आर्याने निक्कीला भिडण्याचे दिले संकेत

'ती माझ्या बापावर गेली.. आणि मी ती व्यक्तीच नाही की बापाबद्दल ऐकून घेईन. चूक तिचीच होती.. पण माझ्याकडून हिंसा नको व्हायला हवी होती. कारण मी निक्की नाहीए.. आणि हिंसा ही चुकीचीच आहे. पण देखील म्हणत नाही.. कारण मी काही त्या गोष्टीच समर्थन करणार नाही.' 

ADVERTISEMENT

'जेव्हा एवढा वेळ आपला त्या व्यक्तीबद्दल राग साचलेला असतो.. तर त्या पॉईंटला ना नैसर्गिक प्रतिक्रिया येते.. तशीच माझी प्रतिक्रिया तेव्हा होती. माझ्याकडून हिंसा झाली याचा मला पश्चाताप नक्कीच आहे. पण तिला जे मिळायला हवं होतं त्याबाबत मला नक्कीच पश्चाताप नाही.' असं आर्या यावेळी म्हणाली. 

ADVERTISEMENT

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT